NCB ने आर्यनची केलेली चौकशी खरी कि खोटी नवाब मालिकांचा सवाल

नवाब मलिक म्हणाले की, NCB ने आर्यन खानची (Aryan Khan) चौकशी केली आहे ती सारी सांगा आणि झालेल्या चौकशीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बाहेर आणा.
Nawab Malik asks NCB to release video of Aryan Khan counseling
Nawab Malik asks NCB to release video of Aryan Khan counseling Dainik Gomantak
Published on
Updated on

आर्यन खान (Aryan Khan) सध्या मुंबई क्रूज प्रकरणात (Mumbai Cruse Issue) आर्थर रोड जेलमध्ये (Arthur road jail) आहे. आर्यन खानच्या NCB कडून चौकशी झाल्याचे वृत्त देखील मिळत आहे. आर्यन खानने चौकशीत एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, तुरुंगातून बाहेर जाऊन तो आम्ली पदार्थाला स्पर्शही करणार नाही आणि देशाचा एक जबाबदार नागरिक बनेल. पण आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या चौकशीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.(Nawab Malik asks NCB to release video of Aryan Khan counseling)

नवाब मलिक म्हणाले की, जेव्हा NCB ने आर्यन खानची चौकशी केली आहे ती सारी सांगा आणि झालेल्या चौकशीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बाहेर आणा. नवाब मलिक यांचे म्हणणे आहे की, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यन खानचे तुरुंगात समुपदेशन केले होते, अशा सकारात्मक बातम्या आणून प्रसिद्धी स्टंट केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना समुपदेशनादरम्यान सांगितले होते की ते तुरुंगातून बाहेर जाऊन गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींना मदत करेल तो असे करेल की प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटेल. आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितले होते की भविष्यात त्याचे नाव चुकीच्या कारणांसाठी कधीही येणार नाही. मुनमुन धामिचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा, अरबाज मर्चंटसह आर्यन खान यांना मुंबई क्रूज ड्रग्स पार्टीमध्ये एनसीबीने अटक केली आहे.

Nawab Malik asks NCB to release video of Aryan Khan counseling
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी खळबळ!

जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलताना आर्यन खानला स्थानिक न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. जी 20 ऑक्टोबरपर्यंत म्हणजसह आज संपत आहे आणि आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आणि आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, शाहरुख खानने आर्यन खानला 4500 रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे. या पैशातून आर्यन खान जेलच्या कॅन्टीनसाठी खर्च करू शकतो. जेल मॅन्युअलनुसार आरोपींना त्यांच्या खर्चासाठी दरमहा मनीऑर्डर पाठवता येतात. परंतु मनी ऑर्डरसाठी ही रक्कम 4500 पेक्षा जास्त असू शकत नाही.

दरम्यान आर्यन खानला तुरुंगात राहावे लागेल की त्याला जामीन मिळेल, यावर कोर्ट आज आपला निर्णय देईल. शेवटच्या सुनावणीनंतर आज न्यायालय आपला निर्णय देणार आहे. न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे की आज आर्यन खान मन्नत येथील त्याच्या घरी जाईल अन्यथा त्याला आर्थर रोड जेलमध्ये आणखी काही वेळ घालवावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com