संजय राऊत संपादकाच्या लायकीचे नाहीत: नारायण राणे

पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणेंनी (Narayan Rane) संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे
Narayan Rane: Sanjay Raut doesn't deserve to be an editor
Narayan Rane: Sanjay Raut doesn't deserve to be an editorDainik Gomantak
Published on
Updated on

पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणेंनी (Narayan Rane) संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सामनाच्या (Samna News Paper) अग्रलेखावरून प्रश्न विचारला असता संजय राऊत हे संपादकाच्या लायकीचे नाहीत ते फक्त मुख्यमंत्र्यांना (Chief Minster Uddhav Thackeray ) खुश करण्यासाठी अग्रलेख लिहितात अशी जहरी टीका केली आहे. (Narayan Rane: Sanjay Raut doesn't deserve to be an editor)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) आणि शिवसेना यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. काही दिवसांपूर्वी महाडध्ये नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेना आणि राणे समर्थक यांच्यात निर्माण झालेली रस्त्यावरील लढाई अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंबंधी महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक शहरांमध्ये खटला दाखल करण्यात आला.

Narayan Rane: Sanjay Raut doesn't deserve to be an editor
Narayan Rane: देश कायद्याने चालतो हे सिध्द झालं

काल रात्री उशिरा नारायण राणे यांच्यावर दाखल केलेल्या खटल्याच्या विरोधात न्यायालयाने सुनवाणी झाली. आणि अखेर त्यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात वादंगाचे सत्रच सुरु झाले. आता भाजपने शिवसेनेवर पलटवार करत दसरा मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यासंबंधी तक्रार दाखल करण्याचा विचार सुरु केला आहे. त्यामुळे आता पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे काय बोलतील याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com