Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा मास्टरमांइड फहीम खान गजाआड, कोर्टाने 21 मार्चपर्यंत सुनावली पोलिस कोठडी

Nagpur Violence Mastermind Fahim Khan Arrested: नागपूर हिंसाचार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. हिंसाचार प्रकरणातील मास्टरमांइडच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आले.
Nagpur Violence
Nagpur ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

Nagpur Violence Mastermind Fahim Khan Arrested

नागपूर हिंसाचार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. हिंसाचार प्रकरणातील मास्टरमांइडच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आले आहे. फहीम शमीम खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले, जिथे त्याला 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्यासोबत अटक केलेल्या 51 जणांनाही पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दावा केला की, 40 वर्षीय फहीमने दंगल भडकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, फहीमने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

फहीमने भडकाऊ भाषण दिले

मिळालेल्या माहितीनुसार, फहीमने भडकाऊ भाषण देऊन लोकांना भडकावले. यानंतरच हिंसाचाराला सुरुवात झाली. फहीम हा नागपूरच्या (Nagpur) संजय बाग कॉलनीतील यशोधरा येथील रहिवासी आहे. त्याचे नाव यापूर्वीही अनेक वादात समोर आले आहे. मात्र निवडणूक लढवून तो राजकारणात सक्रिय झाला.

Nagpur Violence
Maharashtra Murder Case: महाराष्ट्रात खून करुन फरार झालेल्या दोघांना गोव्यातून अटक

पोलिस एनएसए लागू करण्याच्या तयारीत

दरम्यान, हिंसाचार भडकावल्याप्रकरणी नागपूर पोलिस फहीमविरुद्ध एनएसए अंतर्गत कारवाई करु शकते. त्याच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिस सध्या त्याचे कॉल डिटेल्स आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीज तपासत आहेत.

हिंसाचाराची पूर्वनियोजित योजना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर हिंसाचाराची पूर्वनियोजित योजना होती. फहीमने काही लोकांना एकत्र करुन नियोजित दंगल घडवून आणली. रिपोर्टनुसार, हिंसाचाराच्या एक दिवस आधी, दंगलखोर लोकांनी गणेशपेठ पोलिस ठाण्याबाहेर जमून 'औरंगजेब जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. जमावाला भडकवण्यात फहीमचा मोठा वाटा आहे. सोमवारी (17 मार्च) रात्री मध्य नागपूरमधील चिटणीस पार्क परिसरात हिंसाचार उसळला. यावेळी दंगलखोरांनी पोलिसांवर (Police) दगडफेक केली, ज्यामध्ये 34 पोलिस जखमी झाले.

आतापर्यंत पोलिसांनी हिंसाचार प्रकरणात मुख्य आरोपीसह 50 जणांना अटक केली आहे. पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि, 12 पोलीस ठाणे क्षेत्रात अजूनही जमाबंदी लागू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com