आघाडी सरकार बनवण्यात माझा किंचितसा हात; शरद पवार

केंद्रातील बीजेपी सरकार सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहे असे ठिकाणी पहावयास मिळत आहे
Sharad Pawar
Sharad PawarDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकारला सामान्य लोकांविषयी आस्था नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती रोज वाढत आहेत आणि सामान्य माणसांच्या जीवनात या अडचणी वाढवत आहेत. तसेच विजेचे दर दिवसेंदिवस वाढवले जात आहेत.

महाराष्ट्राला कोळश्यासाठी निधी देण्यास केंद्राकडून उशीर केला जात आहे. एका बाजूला 35 हजार कोटीचा घोटाळा होतोय. आणि महाराष्ट्राला कोळशायासाठी निधी दिला जात नाही. निधीच्या पैसे आठ ते दहा दिवसात येतो म्हणून अद्याप दिले नाहीत. आणि मग महाराष्ट्र सरकारला दोषी ठरवले जाते हे बरोबर नाही.

Sharad Pawar
Maharashtra: शिवसेना जनतेशी बेईमानी करून सत्तेवर आली; देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि देशाच्या संसदेमध्ये मी अनेक वर्षे काम केले आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस तर दिल्लीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार तसेच कधी गुजरात सरकार असे अनेक सरकारचे कामे मी पहिले आहेत. आताच केंद्रातील बीजेपी सरकार सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहे असे आम्हाला ठिकाणी पहावयास मिळत आहे.

बीजेपी सरकार हे सरकारी यंत्रणेचा सत्तेसाठी गैरवापर करत आहे. सीबीआय ED अश्या अनेक सरकारी खात्याचा वापर करत आहेत.

CBI ला जर कोणाची चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची त्यांना परवानगी घ्यावी लागते. परंतु असे न करता ते सरळ येऊन चौकशी करतात. असे त्यांना करता येत नाही. यातून स्पष्ट होते सत्तेचा असा गैरवापर करून अशा परवानग्या न घेता या यंत्रणेला चौकशी करायला सांगण्यात येत आहे.

Sharad Pawar
ठाकरे सरकारची शेतकऱ्यांना 10,000 कोटींची नुकसान भरपाई

हे केंद्र सरकार (Central Government )जे आदेश देत आहे त्याची व्यवस्थित अंमलबजावणी कुठे झाली आहे का? हे पाहणेही तितकेच गरजेचे आहे. जे अंमलबजावणी करण्यास सांगत आहेत त्यांची चौकशी केली तर हेच अडचणीत येतील. तसेच 35 हजार कोटीची केंद्र सरकारकडून येणे बाकी आहे.

मुंबईतील पोलीस (Police) कमिशनरच गायब होतो ही गोष्ट फार गंभीरबाब आहे. केंद्र सरकार स्वतःची जबाबदारी विसरत आहे

दोन वर्षांपूर्वी ED नावाची यंत्रणा बऱ्याच लोकांना माहीत नव्हती. परंतु सतत ईडी च्या नावाखाली चौकशी करून जनतेमध्ये भीती आणि आपले स्थान टिकवण्यासाठी हे ईडी कडून महिला खासदाराची ही चौकशी करतात.

तसेच अंमली पदार्थाच्या नावाखाली नवाब मलिक यांच्या नातेवाईकांना तुरुंगात डांबून ठेवून स्वतःची दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नवाब मलिकांचा जवायला अटक करून त्यांच्यावर अनेक आरोप केले. नवाब मलिकांचा जवायला सहा महिने तुरुंगात डांबून ठेवले त्यानंतर यांच्याकडे काहीही पुरावे सापडले नाहीत. त्यानंतर त्यांच्याकडे हा गांजा नव्हताच असे सरकारी यंत्रणेने समोर आणले. अश्या प्रकारे अनेकांना त्रास देणे सुरू आहे. तसेच, नवाब मलिक यांनी केंद्राच्या विरोधात भूमिका मांडलेली त्यामुळे त्यांच्या जावयाला लगेच अटक केली. असे अनेक गोष्टीतून सत्तेचा कसा गैरवापर होते हे सांगता येईल.

हे स्वतः गुन्हेगार असून चांगल्या लोकांच्या विरोधात खोटा पुरावा दाखल करून त्यांना अडकवायचं प्रयत्न करीत आहेत.

Sharad Pawar
कोळशाचा पुरवठा थांबवण्याचे केंद्राला राज्यानेच सांगितले! केंद्रीय राज्यमंत्री दानवे

इन्कम टॅक्स:

अजित पवारांच्या भगिनी यांच्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली. त्यांना काहीही मिळाले नाही मी चौकशी केल्यानंतर अशी माहिती मला मिळाली. तसेच त्यातून त्यांना काहीही निष्पन्न झाले नाही. अश्या प्रकारे चार ते पाच दिवस १० ते १५ लोकांचा ताफा त्यांच्या घरात जाऊन बसतो आणि घरातील लोकांना त्रास देतात. एक-दोन दिवसातच त्यांना त्यातून काहीही मिळाले नाही. तरी ते तिथेच थांबले होते. काही अधिकाऱ्यांना विचारले तुमचं काम संपलं आहे का? तर त्यांना फोन येत होते. तुम्ही इथेच थांबा.. अजून चौकशी करा.. यानंतर त्यांच्याकडून तेच तेच प्रश्न विचारले गेले. इन्कम टॅक्सला चौकशी करायचा अधिकार आहे, परंतु 4-5 दिवस काम नसताना तिथे थांबणे चुकीचे आहे.

तसेच छपे टाकणारे अधिकारी स्वतः याबद्दल पुढे येऊन काहीही सांगत नाहीत. परंतु भाजपातील काही नेते पुढे येऊन त्याबद्दल सांगत असतात. असे करण्याच्या त्यांना अधिकार नाहीय. एखाद्याची चौकशी करणे आणि छापे टाकणे यानंतर भाजपाच्या नेत्यांनी त्याचे स्पष्टीकरण देणे हे चुकीच आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातले हे सरकार टिकणार नाही. असे सतत बरळले जात होते. परंतु या सरकारला दोन वर्षे उलटून गेले. हे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे.

जवळपास वीस वर्ष भाजपा चे काम एकनाथ शिंदे यांनी केले. परंतु ते आता राष्ट्रवादीमध्ये आले आहे. त्यांनी पक्ष बदलला म्हणून त्यांच्या विरुद्ध खटला लावला. तसेच त्यांच्या पत्नी याना सुद्धा यामध्ये सामील केले होते. या खटल्याचा निकाल लागला. यामध्ये ते स्वच्छ आहेत असा निष्कर्ष समोर आला. याचा अर्थ पक्ष सोडल्यानंतर बीजेपी हे सत्तेचा गैरवापर करून त्रास देत आहे.

Sharad Pawar
Breaking News: आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

महाराष्ट्रात आघाडी सरकार स्थापन झाले यामध्ये माझा एक किंचित हात आहे. बाळासाहेबांचा आणि माझा सलोखा अत्यंत जवळचा होता. मी माझ्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार त्यांच्या हाती जावा असा माझा अट्टाहास होता. मी उद्धव ठाकरे यांच्या जवळ बसलो होतो.मुख्यमंत्री पदासाठी त्यांचा हात मी स्वतः वर केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, प्रत्येक मुख्यमंत्र्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असते.सरकारने त्यांची यंत्रणा ही एका ठिकाणी राहून आणि निर्णय घेण्यासाठी सरकार एका ठिकाणी बसून राहते हे कधीही चांगले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रावर सतत संकटावर संकट येत आहेत. कोरोना सारखे मोठ्या संकटात तुम्ही घरी बसा आम्ही तुमची काळजी घेऊ असे उद्धव ठाकरे यांनी सर्व जनतेला संबोधित करून त्यांनी जनतेची खरोखरच खूप काळजी घेतली आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय यंत्रणा ही मजबूत बनवली आहे.

उद्धव ठाकरे हे एका ठिकाणी राहून जनतेसाठी योग्य असणारे निर्णय घेत असतात त्यामुळे त्यांच्यावर टीका टिपणी कोणीही करू नये. तसेच असे छापे मारणे बंद करावे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की त्यांनी या सरकारवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कोणतेही आक्षेप घेऊ नये. हे सरकार आपल्या कामातून जनतेचे मत जिंकून पुन्हा निवडून येईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com