Mumbai: नवनियुक्त पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईकरांना दिलं मोठं गिफ्ट

मुंबईचे (Mumbai) नवनियुक्त पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी बुधवारी फेसबुक पोस्टद्वारे शहरातील रहिवाशांसाठी आपला मोबाइल नंबर शेअर केला आहे.
Mumbai Police Commissioner Sanjay Pandey
Mumbai Police Commissioner Sanjay Pandey Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी बुधवारी फेसबुक पोस्टद्वारे शहरातील रहिवाशांसाठी आपला मोबाइल नंबर शेअर केला आहे. त्याचबरोबर आयुक्तांनी आपल्याशी थेट संपर्क साधण्यास सांगून रहिवाश्यांकडून सूचनाही मागवल्या आहेत. त्यांनी नागरिकांना आपल्या ट्विटर प्रोफाइलवर देखील संपर्क साधण्यास सांगितले आहे. पांडे यांनी सोमवारी हेमंत नागराळे यांच्याकडून मुंबई पोलीस आयुक्तपदाचा (Mumbai Police Commissioner) पदभार स्वीकारला. (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey Has Shared His Mobile Number For Residents)

दरम्यान, एका ट्विटद्वारे त्यांनी सांगितले की, ''आम्हाला मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आणि या क्रमाने आम्ही पहिल्यांदा वाहने टोइंग करणे थांबवू. तसेच आम्ही हा प्रयोग म्हणून सुरु करत आहोत आणि लोक जेव्हा नियम पाळतील तेव्हाच ते अंतिम होईल. तुम्ही तुमच्या सूचना आम्हाला द्या.''

Mumbai Police Commissioner Sanjay Pandey
मुंबईचे नवे पोलिस आयुक्त बनले संजय पांडे

हा प्रयोग हवालदारांसोबत शेअर केला

संजय पांडे यांनी महाराष्ट्राचे डीजीपी म्हणून आपला मोबाईल नंबर पोलीस हवालदारांशीही शेअर केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे त्यांनी हवालदारांशी संवाद साधला आहे. नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही याच पद्धतीची पुनरावृत्ती करण्याचा विचार करत आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com