मुंबईतही सुरु होणार गोव्यासारखी पायलट सेवा! रिक्षा-टॅक्सीला पर्याय, दर खिशाला परवडणारा; माहिती घ्या

Mumbai pilot service start: राज्य परिवहन प्राधिकरणाने ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांच्या मूळ कंपन्यांना मुंबई महानगर प्रदेशात बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी तात्पुरते परवाने दिले
pilot service in mumbai
pilot service in mumbaiDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने (STA) Ola, Uber आणि Rapido या ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांच्या मूळ कंपन्यांना मुंबई महानगर प्रदेशात बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी तात्पुरते परवाने दिले आहेत. यामुळे मुंबईतील प्रवाशांना प्रवासासाठी एक किफायतशीर आणि सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

हे परवाने 'महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५' नुसार काही अटींवर मंजूर करण्यात आले आहेत. या कंपन्यांना एका महिन्याच्या आत सर्व अटी पूर्ण करून कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

किमान भाडे १५ रुपये

राज्य परिवहन प्राधिकरणाने १८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत बाईक टॅक्सीचे भाडे निश्चित केले आहे. त्यानुसार, प्रत्येक प्रवासासाठी किमान भाडे १.५ किलोमीटरसाठी १५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर, पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी प्रवाशांना १०.२७ रुपये मोजावे लागणार आहेत. हे दर राज्यभर लागू होणार असून, 'खटुआ पॅनल'ने ठरवून दिलेल्या सूत्रानुसार निश्चित करण्यात आले आहेत. याच सूत्राचा वापर रिक्षा आणि टॅक्सींचे भाडे ठरवण्यासाठीही केला जातो. वर्षभरानंतर या भाड्याचा आढावा घेतला जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

pilot service in mumbai
Pilot In Goa: मोटरसायकल पायलट व्यवसायाचे संरक्षण करा! आलेमावांचे आवाहन; कर्नाटकातील बंदीचा गोव्यात परिणाम?

इतर वाहनांच्या तुलनेत भाडे कमी

नवीन निश्चित केलेले बाईक टॅक्सी भाडे मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षांच्या किमान भाड्यापेक्षा खूपच कमी आहे. मुंबईत काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपये, तर रिक्षाचे किमान भाडे २६ रुपये आहे. यामुळे प्रवाशांना बाईक टॅक्सीचा पर्याय स्वस्त पडणार आहे.

आधी बंदी, आता नियमन

याआधी, जानेवारी २०२३ मध्ये राज्य सरकारने ॲप-आधारित बाईक टॅक्सी सेवांवर बंदी घातली होती. त्यावेळी खासगी दुचाकींचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात होता. बंदी असूनही काही कंपन्यांनी ही सेवा सुरू ठेवली होती. त्यामुळे, परिवहन विभागाने अशा काही कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले होते. आता नवीन नियमांनुसार परवाने दिल्याने बाईक टॅक्सी सेवा कायदेशीररित्या सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com