Mumbai News: बालगृहात 16 वर्षीय मुलाची 4 अल्पवयीन मुलांनी बेदम मारहाण करून केली हत्या

माटुंगा येथील डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल अँड चिल्ड्रन होममध्ये चार अल्पवयीन मुलांनी एकाच घरात राहणाऱ्या 16 वर्षीय मतिमंद मुलाला बेदम मारहाण केली.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

माटुंगा (Matunga) येथील डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल अँड चिल्ड्रन होममध्ये मंगळवारी सायंकाळी चार अल्पवयीन मुलांनी एकाच घरात राहणाऱ्या 16 वर्षीय मतिमंद मुलाला बेदम मारहाण केली. 12 ते 17 वयोगटातील चारही मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai News A 16 year old boy was brutally beaten to death by 4 minors in a children home)

Crime News
'तुला याची किंमत मोजावी लागेल...', माजी NCB अधिकारी समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

या प्रकरणाचा तपास (Mumbai crime news) करत असलेल्या शिवाजी पार्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार मुले बालगृहाच्या कॉमन हॉलमध्ये जमली आणि त्यांनी 16 वर्षांच्या मुलाला वारंवार लाथा-बुक्क्या मारल्या. या हल्ल्यात पीडिता बेशुद्ध पडली आणि या अवस्थेत तो बालगृहाच्या वॉर्डनला सापडला तर त्याला तात्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला डॉक्टरांनी 'मृत' घोषित केले.

घटनेच्या वेळी हॉलमध्ये 12-15 मुले होती

रुग्णालयातून मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातील पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र, बुधवारी शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्यांना दुखापत झाल्याचे लक्षात आले तर डॉक्टरांच्या मते, मुलाचा मृत्यू गंभीर अंतर्गत जखमांमुळे आणि आघाताने झाला आहे. यानंतर पोलीस आणि बालगृहाच्या अधिकाऱ्यांनी इतर लोकांची चौकशी देखील केली. घटनेच्या वेळी हॉलमध्ये सुमारे 12-15 मुले असल्याचे त्यांना आढळून आले.

मृत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी एकाने पोलिसांना सांगितले की, चार मुलांपैकी कोणत्या मुलाने मृताला मारहाण केली होती. प्राथमिक तपासात त्याची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी या चौघांनाही डोंगरी रिमांड होममध्ये पाठवण्यात आले असून तेथे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मुलांना ठेवले जाते.

Crime News
Maharashtra News: गल्लीत गोंधळ अन् 'दिल्लीत' चर्चा! फडणवीसांची एन्ट्री तर गडकरींचे एक्झिट

दोन आरोपींचा गुन्हेगारी इतिहास आहे

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्यापैकी दोघांचा गुन्हेगारी इतिहास आहे आणि त्यांच्या सुधारणेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर, त्यांच्या पालकांचा शोध न लागल्याने त्यांना माटुंगा सुविधेत हलवण्यात आले आहे. माटुंगा स्टेशनसमोरील डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल आणि चिल्ड्रन होममध्ये फक्त अनाथ किंवा सोडून दिलेली मुले किंवा काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुले असतात.

या महिन्याच्या सुरुवातीला मृत किशोरला माटुंगा येथील बालसुधारगृहात दाखल करण्यात आले होते तर 6 ऑगस्ट रोजी सीडब्ल्यूसीच्या आदेशानुसार पोलिसांनी त्याला माटुंगा बालगृहात सुरक्षित ठेवण्यासाठी पाठवले होते. पोलिसांनी सांगितले की, हसन राजकुमार निषाद असे या मुलाचे नाव आहे, तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे आणि स्पष्टपणे बोलू देखील शकत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com