Mumbai Metro च्या Metro 7, Metro 2A लाईनचं गुढी पाडवा च्या मुहूर्तावर होणार लोकार्पण

'मुंबई मेट्रो 7' आणि 'मेट्रो 2ए' या नव्या मार्गिकेचे गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
Mumbai Metro News Updates
Mumbai Metro News UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबईकरांना मराठी नवीन वर्षाच्यानिमित्ताने मोठी भेट मिळणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुडी पाडव्याला मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) दोन नव्या लाईनचे उद्घाटन होणार आहे. तब्बल 8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 7' आणि 'मेट्रो 2ए' या नव्या मार्गिका येणार आहेत. यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. (Mumbai Metro News Updates)

IANS वृत्तसंस्थेला MMRDA Metropolitan Commissioner S.V.S Srinivas यांनी दिलेल्या माहितीनुसार गुढीपाडव्या शुभ मुहूर्तावर मुंबईतील नागरिकांना दोन नव्या मेट्रो मार्गिका मिळणार आहेत. या दोन्ही मार्गिकांचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी या मेट्रोचं ट्रायल रन्स मध्ये सहभाग घेतला होता. मुंबईमध्ये (Mumbai) मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर धावणार आहे. त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किमी धावणार आहे. मुंबई 'मेट्रो 7' चे तिकिट किमान 10 रुपये असणार असून कमाल दर 80 रुपये असणार आहेत.

Mumbai Metro News Updates
Maharashtra Weather Update: येत्या चार दिवसांत उष्णतेचा पारा वाढणार

* ममेट्रो 2 अ मार्ग

'मेट्रो 2 अ' हा 18.5 किमी लांबीचा असणार आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर असे स्थानके असतील.

* मेट्रो-7 मार्ग

मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com