Mumbai-Goa Highway: कोट्यवधींचा खर्च, अपघाती मृत्यूची संख्या वाढली! जबाबदार कोण? नव्या डेडलाईनवरुन शरद पवारांच्या NCP चा सवाल

Sharad Pawar Party On Mumbai-Goa Highway Construction: 2012 मध्ये सुरु झालेल्या या महामार्गाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा वायदा सरकारकडून करताच शरद पवारांच्या पक्षाने महामार्गाच्या कामावरुन सरकारवर फैलावर घेतले.
Mumbai-Goa Highway: कोट्यवधींचा खर्च, अपघाती मृत्यूची संख्या वाढली! जबाबदार कोण? नव्या डेडलाईनवरुन शरद पवारांच्या NCP चा सवाल
Mumbai-Goa HighwayDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Goa Highway: गेल्या दीड दशकात अनेक सरकारे आली आणि गेली, पण मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास नेण्याचे कोणत्याही सरकारने म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत. 2012 मध्ये सुरु झालेल्या या महामार्गाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा वायदा सरकारकडून करताच शरद पवारांच्या पक्षाने सरकारला फैलावर घेतले.

महामार्गाच्या कामावर आतापर्यंत झालेल्या खर्चाचा लेखाजोखा मांडत शरद पवारांच्या पक्षाने निशाणा साधाला. एवढ्यावरच न थांबता महामार्गाच्या कामासाठी वाढलेला खर्च आणि अपघाती मृत्यूला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी यावेळी केला. या महामार्गाच्या कामाचा खर्च 3500 कोटींवरुन 7500 कोटींवर पोहोचला. मात्र अजूनपर्यंत महामार्गाचे काम तडीस गेले नाही, असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला.

जमीन संपादन ते कंत्राटदारांकडून होणार विलंब

दरम्यान, 2012 मध्ये सुरु झालेल्या या महामार्गाच्या कामाला जमीन संपादन, कंत्राटदारांकडून होणारा विलंब आणि इतर प्रशासकीय अडचणींमुळे अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. सध्या माणगाव, इंदापूर, पाली, लांजा, कोलाड आणि चिपळूण येथील बायपास, अंडरपास आणि उड्डाणपुलांची काही कामे प्रलंबित आहेत.

दुसरीकडे, सीमेंट काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता महामार्गाच्या गुणवत्तेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहे. मागील 17 वर्षांपासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. तर इंदापूर ते कशेडीपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात आजही अनेक ठिकाणी महामार्गाचे काम प्रलंबितच आहे.

Mumbai-Goa Highway: कोट्यवधींचा खर्च, अपघाती मृत्यूची संख्या वाढली! जबाबदार कोण? नव्या डेडलाईनवरुन शरद पवारांच्या NCP चा सवाल
Mumbai Goa Highway: महत्वाची बातमी! कासू-इंदापूरचा टप्पा वगळता पावसाळ्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग होणार सज्ज

'जून 2025' महामार्गाचं काम पूर्ण करण्याची नवी तारीख

महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा महामार्ग (NH-66) चौपदरीकरण प्रकल्प मे-जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई ते गोवा (Goa) प्रवासाला सध्या सरासरी 12 तास लागतात तो वेळ 6 तासांपर्यंत कमी होईल. दुसरीकडे मात्र, आतापर्यंत झालेल्या महामार्गाच्या हजारो कोटींच्या वाढीव खर्चाला, रखडलेल्या कामाला आणि असंख्य अपघाती मृत्यूंना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Mumbai-Goa Highway: कोट्यवधींचा खर्च, अपघाती मृत्यूची संख्या वाढली! जबाबदार कोण? नव्या डेडलाईनवरुन शरद पवारांच्या NCP चा सवाल
Mumbai-Goa Highway: जायचं होतं एकीकडे, पोहोचला भलतीकडे!!मुंबई-गोवा महामार्गावर दिशादर्शक फलकांची गरज

महामार्गाच्या कामावरुन राजकारण

मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) कामावरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी भरपूर राजकारण केलं. विरोधात असणारा पक्ष ज्यावेळी सत्तेत येतो तेव्हा महामार्गाच्या कामावरुन आश्वासनांची खैरात वाटतो आणि तोच पक्ष जेव्हा विरोधात जातो तेव्हा सत्तेत असणाऱ्या पक्षाला महामार्ग कधी पूर्ण होणार? या प्रश्नावरुन घेरतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com