Mumbai Goa Highway Bus Fire: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी दुर्घटना, मालवणला जाणारी बस जळून खाक; चाकरमानी थोडक्यात बचावले

Mumbai Goa Highway Bus Fire: सध्या कोकणवासियांना गणपतीची चाहूल लागली आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी परतत आहेत.
Mumbai Goa Highway Bus Fire
Mumbai Goa Highway Bus FireDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Goa Highway Bus Fire

सध्या कोकणवासियांना गणपतीची चाहूल लागली आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी परतत आहेत. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांची मोठी गर्दी सध्या महामार्गावर दिसून येते. अनेकांनी आपल्या गावी पोहोचायला सुरुवात केली असतानाच मुंबईहून मालवणच्या दिशेने निघालेल्या एका खाजगी लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला आहे.

शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली. गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांनी भरलेल्या या बसला अचानक आग लागली.

Mumbai Goa Highway Bus Fire
Goa Sand Mining: रेती परवाने रुतले CRZ मध्ये, NIO चा प्रतिकूल अहवाल; सरकारचे ‘सँडविच’, केंद्रीय मंत्रालयाने घातली बंदी

सुरुवातीला मोठा आवाज होताच टायर फुटल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखत बस तात्काळ थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. काही मिनिटांतच संपूर्ण बसला आग लागली आणि ती जळून खाक झाली.

Mumbai Goa Highway Bus Fire
Goa Politics: सोमवारी होणार खातेवाटप, दामू नाईकांची स्पष्टोक्ती; अमावस्येमुळे निर्णय लांबल्याचा निर्वाळा

गणेशभक्तांनी जीवावर उदार होऊन बाहेर पळ काढला असल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातस्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच बस पूर्णपणे जळून खाक झाली. प्रवाशांचे सामानसुद्धा आगीत भस्मसात झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com