मुंबई-गोवा क्रूज प्रवासाचा कोकणवासियांना होणार फायदा

गोवा महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवरील सागरी निसर्ग सौंदर्यांचा मनमुराद आनंद घेत, या आलिशान क्रुझची सागरी सफर प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे.
Mumbai Goa cruise will also stop at Konkan
Mumbai Goa cruise will also stop at Konkan Dainik Gomantak
Published on
Updated on

रत्नागिरी: मुंबई ते गोवा (Mumbai to Goa) या सागरी मार्गावरील आलिशान क्रुज (cruise) प्रवास सुरू झाला आहे. या आनंदाची बातमी अशी की, मुंबई ते गोवा या क्रुज प्रवासाचा फायदा रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील गुहागरलाही मिळण्याची शक्यता आहे. कारण मुंबई ते गोवा या प्रवासादरम्यान या आलिशान क्रुझला गुहागर तालुक्यातील वेलदूर येथे थांबा मिळाला असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जेटीचे काम वेलदूर येथे अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शृंगारतळी येथे दिली.

त्यामुळे आता गोवा महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवरील सागरी निसर्ग सौंदर्यांचा मनमुराद आनंद घेत, या आलिशान क्रुझमधून सर्व सुखसोयींनीयुक्त अशी ही सागरी सफर प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे. मात्र, मुंबई ते गोवा अशी थेट सोय असल्याने महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीवर या क्रुझला थांबा नव्हता. मात्र आता गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी संबंधितांशी चर्चा करून वेलदूर येथे या क्रुझला थांबा मंजूर करून घेतला आहे.

Mumbai Goa cruise will also stop at Konkan
दिवाळीच्या तोंडावरच 'लालपरी' वर दुहेरी संकट, शासनाची भाडेवाढ अन् कर्मचारी संपावर

त्यासाठी वेलदूर येथे जेटी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे माहितीही आमदार जाधव यांनी माध्यमांना दिली. क्रुझच्या वेलदूर येथील थांब्यामुळे गुहागरच्या पर्यटन व्यवसायावर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा प्रवासावर या आलिशान क्रुझला वेलदूर येथे थांबा मिळाल्यास गुहागरच्या पर्यटन व्यवसायामध्येही मोठी वाढ होण्याची आशा येथील पर्यटनप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.

Mumbai Goa cruise will also stop at Konkan
जोतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत ई पास दर्शन व्यवस्था बंद करा

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील समुद्र किनाऱ्‍यावर गुकाही प्रसिद्ध देवस्थाने असून, या देवस्थानांनाही क्रुजवरून सफर करणाऱ्या पर्यटकांना भेट देता येईल. आणि त्यामुळे या भागातील पर्यटनालाही वाव मिळेल. गुहागरच्या पर्यटन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी व येथील तरुणांना आणि व्यावसायिकांना रोजगार मिळावा यासाठी आमदार जाधव यांनी प्रयत्न केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com