VIDEO: 10व्या मजल्यावरुन थेट मृत्यूच्या दाढेत, पण... 24 वर्षीय नवविवाहितेचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार व्हायरल; मुंबईतील चक्रावणारी घटना

Mumbai Bhandup 10th Floor Fall Rescue: "जेव्हा माणसाचे आयुष्य अजून बाकी असते, तेव्हा काळही त्याचे काही बिघडू शकत नाही," याचाच प्रत्यय मुंबईतील भांडुप पश्चिममध्ये आला.
Mumbai Bhandup 10th Floor Fall Rescue
Mumbai Bhandup 10th Floor Fall RescueDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Bhandup 10th Floor Fall Rescue: "जेव्हा माणसाचे आयुष्य अजून बाकी असते, तेव्हा काळही त्याचे काही बिघडू शकत नाही," याचाच प्रत्यय मुंबईतील भांडुप पश्चिममध्ये आला. बुधवारी (26 ऑगस्ट) सकाळी भांडुपमधील एका निवासी इमारतीमध्ये एक अत्यंत विचित्र आणि थरारक घटना घडली. येथील सनशाईन इमारतीच्या 10व्या मजल्यावरुन 24 वर्षांची एक नवविवाहिता अचानक खाली पडली, मात्र सुदैवाने ती थेट जमिनीवर न पडता जवळच असलेल्या एका झाडात अडकल्यामुळे थोडक्यात वाचली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा हिवराले असे या 24 वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती भांडुप पश्चिमेकडील तुळशेतपाडा परिसरातील लेक रोडवर असलेल्या 'सनशाईन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी'मधील 10व्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून खाली पडली. जमिनीवर पडण्याऐवजी ती रस्त्यापासून सुमारे 20 ते 25 फूट उंचावर असलेल्या झाडाच्या फांद्यांमध्ये अडकली. सकाळी 9:32 च्या सुमारास मुंबई (Mumbai) अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Mumbai Bhandup 10th Floor Fall Rescue
Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

अग्निशमन दलाच्या जवानांनी हुक असलेल्या विशेष शिडीचा वापर करुन झाडाच्या फांद्यांपर्यंत पोहोचत अत्यंत कौशल्याने प्रतीक्षाला सुखरुप खाली उतरवले. या विचित्र अपघातातून बचावानंतर तिला तात्काळ रुग्णवाहिकेतून स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तिच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथील डॉक्टरांनी तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.

Mumbai Bhandup 10th Floor Fall Rescue
इंग्रजीचा प्रश्न अन् पाकिस्तानी तरुणानं दिलं वेगळंच उत्तर! Video Viral होताच नेटकऱ्यांनी धरलं डोकं, म्हणाले 'याला काहीच समजलं नाही, पण कॉन्फिडन्स...'

भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा हिचे लग्न अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच झाले होते. सध्या सायन रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय परिस्थिती गंभीर असल्याने पोलीस अद्याप तिचा अधिकृत जबाब नोंदवू शकलेले नाहीत. पोलिसांना मिळालेल्या मेडिकल रिपोर्टनुसार ती सध्या बोलण्याच्या किंवा जबाब देण्याच्या स्थितीत नाही. या घटनेची माहिती तिच्या माहेरच्या नातेवाईकांना देण्यात आली असून, ती खिडकीतून नक्की कशी खाली पडली किंवा यामागे काय कारण होते, याचा सखोल तपास भांडुप पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com