एसटी कर्मचारी संपावर, सरकारचा 9625 कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा

महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) सध्या मोठ्या अडचणीतून जात आहे.
MSRTC suspends 9625 employees who were on strike
MSRTC suspends 9625 employees who were on strikeDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) सध्या मोठ्या अडचणीतून जात आहे. आपल्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या संपात सहभागी झाल्यामुळे शनिवारी आणखी 245 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणी 10 कर्मचाऱ्यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जवळपास महिनाभरापासून एमएसआरटीसीची बससेवा ठप्प झाली आहे. आर्थिक अडचणीतून जात असलेल्या एमएसआरटीसीचे राज्य सरकारमध्ये (Goverment) विलीनीकरण करावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली असून, या मागणीसाठी महामंडळाचे कर्मचारी 28 ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर आहेत.

MSRTC suspends 9625 employees who were on strike
शेतकऱ्यांवर 'अवकाळी' च संकट, कांदा अवघा 1 रुपया किलो

आतापर्यंत 9 हजार 625 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे

MSRTC च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की संपात सहभागी झालेल्या 9,625 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे, तर 1,990 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सद्यस्थितीत 67 आगारांतून बसेस सुरू असून शनिवारी महामंडळाने 1,564 बससेवा चालविल्याचा दावा महामंडळाने केला आहे.

शुक्रवारी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले होते की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे.

सरकारने कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ दिली

अनिल परब यांनी शुक्रवारी सांगितले, “असे अनेक लोक आहेत जे राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना कामावर परत जाण्यापासून रोखत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय हा संप संपणार नाही. राज्य सरकारचे कौतुक करताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने एमएसआरटीसीच्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ दिली आहे. मात्र, पगारवाढ ही फसवी असल्याची अफवा काही लोक पसरवत आहेत. आम्ही पगारवाढीबाबत अधिसूचनाही जारी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या स्लिप्स पाहिल्यावर त्यांना कळेल की आमची फसवणूक झालेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com