Maharashtra MPSC Recruitment 2023
Maharashtra MPSC Recruitment 2023Dainik Gomantak

MPSC Recruitment 2023: लागा तयारीला! एमपीएससीच्या 8,169 पदासाठी जाहिरात निघाली

बुधवारपासून विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करण्यात येणार आहेत.

एमपीएससीच्या (Maharashtra Public Service Commission) जाहिरातीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल आठ हजार 169 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत. शुक्रवारी (ता.20) ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Maharashtra MPSC Recruitment 2023
PM Modi Mumbai Visit: 'मुंबई देश की धडकन...', PM मोदींची मुंबईकरांना भावनिक साद

महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.

विशेष म्हणजे यात लिपीक व टंकलेखक संवर्गातील सर्वाधिक पदे आहेत. बुधवार (दि.25) पासून विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी वयोमर्यादा 1 मे 2023 पर्यंतची गृहीत धरण्यात येणार आहे. आयोगाच्या (MPSC) अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra MPSC Recruitment 2023
Gadchiroli Bike Ambulance: गडचिरोलीतील दुर्गम गावांमध्ये आता धावणार बाईक अॅम्ब्युलन्स

कोणत्या खात्यात किती पदे?

1) सहाय्यक कक्ष अधिकारी यांची 70 पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदे भरली जाणार आहेत. वित्त विभागाचे राज्य कर निरीक्षक 159 पदे तर गृह विभागाचे पोलीस उपनिरीक्षक 374 पदे भरली जातील.

2) गृह विभागाच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे एकूण 6 पदे भरली जाणार आहेत.

3) वित्त विभाग तांत्रिक सहाय्यक एक जागा असेल.

4) वित्त विभागाच्या कर सहाय्यक 468 पदे भरली जाणार आहेत.

5) मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालयात लिपिक टंकलेखनाच्या 7034 जागा या भरल्या जाणार आहेत. मंत्रालयातील प्रसाशकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रीत विविध कार्यालयासाठी या जागा भरल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीतील चाळणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता या परीक्षा 8 फेब्रुवारीला होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com