Udayanraje Bhosale: 'महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का ?' उदयनराजेंचा एल्गार

युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात लवकरच आझाद मैदानात एल्गार करणार असल्याची घोषणा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलीय.
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleDainik Gomantak

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव विचार दिला. जुलमी राजवटीतून मोकळा श्वास महाराजांनी दिला. शिवरायांचा सतत अपमान केला जातोय. 'महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का, असा थेट सवाल भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांनी विचारला आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरुन उदयनराजे आक्रमक झाले आहेत. दरम्यान, युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात लवकरच आझाद मैदानात एल्गार करणार असल्याची घोषणा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलीय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. राज्यपालांवर कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपनेते मंगलप्रभात लोढा या भाजपशी निगडीत नेत्यांकडून महाराजांविषयी वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यावरून भाजपचे खासदार छत्रपती छत्रपती उदयनराजे आक्रमक झाले असून त्यांनी राजगडवर आयोजित आक्रोश मेळाव्यात उदयनराजे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Udayanraje Bhosale
Mumbai News: मुंबईत आजपासून 15 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आक्रोश आंदोलन केले. 'निर्धार शिवसन्मानाचा', असं या आंदोलनाला नाव देण्यात आलंय. यासाठी उदयनराजे रायगडावर शेकडो समर्थकांसह दाखल झाले. पाचाडमध्ये राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन उदयनराजे रायगडावर दाखल झाले. राज्यपालपदावरून कोश्यारींना हटवण्याची कारवाई न झाल्याने उदयनराजे संतापले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com