Sanjay Raut
Sanjay Raut Dainik Gomantak

'मोदी भक्तांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला फक्त ‘ऑस्कर’ द्यायचेच बाकी ठेवले आहे'

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रेम देत आहेत. चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी चित्रपटच्या टीमची भेट घेतली आहे. अनेक राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. यावरून जोरदार राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटावरुन भाजपसह (BJP) मोदी समर्थकांना धारेवर धरले आहे.

Sanjay Raut
Nagpur: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे 3 अधिकारी CBI च्या ताब्यात; काय आहे प्रकरण?

पंतप्रधान मोदी यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट आवडल्याचे जाहीर करताच देशभरातील भक्तांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला फक्त ‘ऑस्कर’ पुरस्कार द्यायचेच बाकी ठेवले, असे संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील रोखठोक सदरात त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मोदींनी ‘द काश्मीर फाइल्स’चा प्रचार सुरू करताच देशभरातील त्यांचे भक्त या चित्रपटाचे (Movie) पोस्टर चिकटविण्याच्या कामास लागले, असा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी लगावला.

Sanjay Raut
चंद्रकांत पाटलांचे विधान ऐकून मोदींची झोप उडाली असेल: संजय राऊत

आमिर खानची प्रतिक्रिया
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे मोठ्या संख्येने प्रेक्षक आणि काही कलाकारांकडून खुलेपणाने कौतुक केले जात असताना, अनेक बड्या स्टार्सनी आतापर्यंत या चित्रपटाबद्दल भाष्य केलेले नाही, त्यामुळे ते लोकांच्या निशाण्यावर आहेत. मात्र, आमिर खानने या चित्रपटाबाबत सांगितलेल्या गोष्टी सध्या चर्चेत आहेत. वास्तविक आमिर खान (Amir Khan) एस.एस. राजामौली यांचा चित्रपट 'RRR' प्रमोशनल इव्हेंटमध्ये पाहुणा म्हणून उपस्थित होता. या दरम्यान विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर त्याने भाष्य केले. तो म्हणाला, 'प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट नक्की बघावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com