
गणेशोत्सव जवळ आल्यानं मुंबई व उपनगरातील कोकणकरांनी आपल्या गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदाही खास रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल ही दोन विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत.
शनिवारी (२३ ऑगस्ट) पहिली विशेष ट्रेन भव्य उत्साहात सुटली. या प्रसंगी मंत्री नितेश राणे यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. गाडीत फेरफटका मारत मंत्री राणे यांनी चाकरमान्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रवासातील अडचणी जाणून घेतल्या. रविवारीदेखील (२४ ऑगस्ट) दुसरी विशेष ट्रेन सुटणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई आणि आसपासच्या परिसरातून हजारो कोकणकर गणेशोत्सवासाठी कोकणात परतत आहेत. घराघरात आणि मंडळांमध्ये बाप्पाचे आगमन होणार असल्याने बाजारपेठा गजबजल्या आहेत. प्रवासी संख्येचा प्रचंड ताण लक्षात घेता या विशेष गाड्या सुरू केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष बाब म्हणजे या गाड्यांमध्ये प्रवासी भक्तांसाठी मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे उपक्रम राबवले जात असून, प्रवाशांकडून त्याचे कौतुक होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.