रोडवर गोंधळ! मद्यधुंद अवस्थेत महिलेने पोलिसाला मारल्या लाथा Video

मद्यधुंद अवस्थेत असलेली एक महिला नवी मुंबईतील रस्त्यावर कॅब चालक आणि पोलिस अधिकाऱ्यावर शिवीगाळ करताना दिसून येत आहे.
Social Media Viral Video
Social Media Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडियावर (Social Media) धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेली एक महिला नवी मुंबईतील रस्त्यावर कॅब चालक आणि पोलिस अधिकाऱ्यावर (Police) शिवीगाळ करताना दिसून येत आहे. (Mess on the road Drunk woman kicks policeman Video)

Social Media Viral Video
“कभी कभी लगता है, अपून ही भगवान है!”

25 मार्च रोजी ही घटना घडली जेव्हा अज्ञात महिला तिच्या 2 मित्रांसह मुंबईमध्ये रात्री उशिरा पार्टीला गेली होती आणि पार्टी झाल्यानंतर कॅबमधून ती पुढे प्रवास करत होती. दारूच्या नशेत असलेल्या एका महिलेने प्रवासादरम्यान कॅब ड्रायव्हरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि ड्रायव्हरला बाजूला ढकलून कार आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

हा गोंधळ लक्षात आल्यानंतर पोलिस आल्यावर तिने एका अधिकाऱ्याची कॉलर धरली आणि त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. कॅब चालक आणि इतर प्रवाशांना रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने शेअर केलेल्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये ती महिला रस्त्यांवर लोळताना आणि झोपलेली दिसून येते आहे.

कॅब चालक आणि पोलिसांना भयंकर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत होती. एका व्हिडिओमध्ये ती फुशारकी मारतानाही दिसून येत आहे ती म्हणते की, पोलीस आणि मीडियाला बोलावूनही मला काहीही होणार नाही.

Social Media Viral Video
Legislative Council Election 2022: देशमुख आणि मलिकांना मतदान परवानगी नाहीच

दारूच्या नशेत सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी तिन्ही मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भूतकाळातील असली तरी हा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे आणि इंटरनेटवर या व्हिडीओ मुळे खळबळ उडाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com