Mangaon Indapur Traffic Jam
Mumbai-Goa Highway TrafficDainik Gomantak

Mumbai-Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी! माणगाव ते इंदापूरदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचा खोळंबा

Mangaon Indapur Traffic Jam: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सोमवार (12 मे) सकाळपासून माणगाव ते इंदापूर दरम्यान वाहनांच्या लांबच-लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
Published on

मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सोमवार (12 मे) सकाळपासून माणगाव ते इंदापूर दरम्यान वाहनांच्या लांबच-लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या वाहतूक कोंडीचा चाकरमान्यांसह प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव ते इंदापूर दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. माणगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडी झाल्याने स्थानिकांसह चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे. ताम्हाणी घाटमार्गे पुण्याहून कोकणात येणारी वाहने माणगावमध्ये अडकली आहेत. वाहतूक कोंडी फोडताना पोलिसांची (Police) दमछाक होत आहे.

Mangaon Indapur Traffic Jam
Mumbai-Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; शिमग्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची उडाली दैना!

यापूर्वी, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (ता.1) मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. सकाळी दहा वाजल्यापासून इंदापूर व माणगाव येथे वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांचा दोन ते तीन तास खोळंबा झाला होता. तसेच, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आणि शनिवार-रविवार निमित्ताने कोकणात तसेच गोव्यात फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांनाही मुंबई (Mumbai) गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com