महिलेच्या अंगावर 'प्रेमपत्र' फेकणे हा गुन्हाच; 2 वर्ष फोडावी लागु शकते 'खडी'

2011 मध्ये घडलेल्या या घटनेत एका 54 वर्षीय व्यक्तीवर आकोल्यातील महिलेने विनयभंगाचा आरोप केला होता, या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपपीठाने हा निर्णय दिला आहे.
Hurling a love letter on married woman can land up you in the prison
Hurling a love letter on married woman can land up you in the prisonDainik Gomantak

आकोल्यामध्ये घडलेल्या एका विनयभंगाच्या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने एत महत्वाची बाब अधोरेखित केली आहे. एखाद्या विवाहीत महिलेला त्रास देणारा म्हणजे प्रेमपत्र किंवा शायरी सदृश्य मजकुर लिहून फेकणे हा सुद्धा विनयभंगच समजला जाणार आहे. त्यामुळे आकोल्यात घडलेल्या या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. (Hurling a love letter on married woman can land up you in the prison)

2011 मध्ये घडलेल्या या घटनेत एका 54 वर्षीय व्यक्तीवर आकोल्यातील महिलेने विनयभंगाचा आरोप केला होता. या घटनेत सदरील महिलेने आरोपीने दिलेली एक प्रेमपत्रा सदृश्य चिठ्ठी फेकण्यास नकार दिला होता. त्यानंतर या आरोपीने ती चिठ्ठी थेट त्या महिलेच्या अंगावर फेकली होती. या चिठ्ठीत आरोपीने मी तुझ्यावर प्रेम करतो असे लिहीले होते. एवढ्यावरच न थांबता या महाशयांनी महिलेला ही बाब कुणालाही न सांगण्याची धमकी देखील दिली होती.

Hurling a love letter on married woman can land up you in the prison
राज्यातील भाजप नेते दिल्ली दरबारी, पक्षसंघटनेत खांदेपालट ?

दरम्यान, प्रकारानंतर पिडीतेने सिव्हील लाईन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलीसांनी तपास करुन सदरील आरोपीला न्यायालयात हजर केले. या प्रकरणात न्यायालयाने सदरील आरोपील दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com