Mumbai Goa Highway Accident: डुलकीने घात केला, गोवा ट्रीप राहिली अपूर्ण; मुंबई - गोवा महामार्गावर अपघातात एकाच घरातील 5 जखमी

Tourist Car Accident: मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे सोमवारी (९ जून) पहाटे भीषण अपघात झालाय. या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत.
Mumbai Goa Highway Accident
Mumbai Goa Highway AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे सोमवारी (९ जून) पहाटे भीषण अपघात झालाय. गोव्याकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सने समोरून जाणाऱ्या डंपरला मागून जोरदार धडक दिली.

हा अपघात पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास झाला असून, या घटनेत गुजरातमधील एकाच कुटुंबातील पाच पर्यटकांसह ट्रॅव्हल्सचा चालक गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅव्हल्सच्या चालकाला झोप लागल्यामुळे अपघात घडल्याचे समोर आले आहे.

अपघात इतका भीषण होता की, डंपरच्या मागील दोन चाकांचा अक्षरश: चेंदामेंदा झालाय. ट्रॅव्हल्स झाडावर आदळून पूर्णपणे पुढून चुरडून गेली. मळगाव जोशी-मांजरेकरवाडी परिसरात ही दुर्घटना घडली असून, रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

Mumbai Goa Highway Accident
Goa Fishing: रापणकरांच्या 11 कलमी मागण्या! मंत्री हळर्णकरांची घेतली भेट; निर्देशांचे पालन व्हावे याबाबत विनंती

मयूर मालविय (३५ वर्षे), समीक्षा मालविय (३२ वर्षे), चंद्रिका मालविय (३७ वर्षे), बन्सी मालविय (२१ वर्षे), हित मालविय (१० वर्षे), विजयकुमार झापडी (३५ वर्षे, ट्रॅव्हल्स चालक) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नवं आहेत.

Mumbai Goa Highway Accident
Goa Fishing: रापणकरांच्या 11 कलमी मागण्या! मंत्री हळर्णकरांची घेतली भेट; निर्देशांचे पालन व्हावे याबाबत विनंती

अपघातात जखमी झालेले सर्वजण गुजरातमधील रहिवासी असून गोवा पर्यटनासाठी खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने निघाले होते. मळगाव परिसरात आल्यानंतर चालक विजयकुमार याला डुलकी लागल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले आणि गाडीने थेट डंपरला मागून धडक दिल्याचं सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com