Goa Fishing: रापणकरांच्या 11 कलमी मागण्या! मंत्री हळर्णकरांची घेतली भेट; निर्देशांचे पालन व्हावे याबाबत विनंती

Fishermen Demands Goa: गोंयच्या रापोणकरांचो एकवोट व इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी मत्सोद्योग मंत्री नीलकंठ हळर्णकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या अकरा कलमी मागण्या ठेवल्या.
Goa fishermen eleven-point demand
Nilkanth HalarnkarDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोंयच्या रापोणकरांचो एकवोट व इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी मत्सोद्योग मंत्री नीलकंठ हळर्णकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या अकरा कलमी मागण्या ठेवल्या.

तसेच एलईडी लाईट फिशिंग, बुल ट्रॉलिंग व पेअर ट्रॉलिंगवर बंदी व मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सात निर्देशांची अंमलबजावणी करा, अशीही विनंती केली. याप्रकरणी स्वविस्तर चर्चेनंतर मंत्री हळर्णकर यांनी सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

Goa fishermen eleven-point demand
Margao Fish Market: 13 कोटींचा प्रकल्प झाला 32 कोटींचा! मडगाव मासळी मार्केट अजूनही प्रतीक्षेत, मार्केटला गोमंतकीय साज द्या- विजय सरदेसाई

‘गोंयच्या रापोणकरांचो एकवोट’चे ओलंसियो सिमोईस व इतरांनी मंत्री हळर्णकर यांची भेट घेतली. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मे २०२५ च्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली. बंदीनंतर एलईडीचा वापरून आदेशाचे उल्लंघन होतच आहे. त्यामुळे तटरक्षक, कोस्टल पोलिस, मत्सोद्योग विभागांना बंदीच्या अंमलबजावणीचे निर्देश द्यावेत,अशी मागणी त्यांनी केली.

Goa fishermen eleven-point demand
Goa Fishing: मोटे मोटे मोळये मासे घरा हाडी! चढणीचे मासे, दीपकावणी; गोव्याच्या मान्सूनातली मत्स्यसंपदा

विविध मागण्यांवर चर्चा

गोव्याच्या प्रादेशिक पाण्यात गोव्याबाहेरील मासेमारी बोटींची मासेमारी थांबविण्यासाठी काही सुधारणा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. खोल समुद्रात ट्रॉलर्ससाठी मासे पकडण्याची मर्यादा नियंत्रित करणे, पावसाळी हंगामातील बंदी ९० दिवसांपर्यंत वाढविणे, मडगावातील घाऊक मासे मार्केट मच्छिमारांकडे सोपवणे, इंधन अनुदानाची रक्कम वाढविणे, या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com