साईनगरीत गुजरात एटीएसची मोठी कारवाई

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत हे काय घडत आहे असा प्रश्न भक्तांच्या मनात उपस्थित झाला आहे.
Shirdi Sai Baba Temple
Shirdi Sai Baba Temple Dainik Gomantak
Published on
Updated on

शिर्डी: साई बाबांचीनगरी म्हणजे शिर्डी. दरवर्षी जगभारतून लाखो साईभक्त शिर्डीला येतात. आता याच शिर्डीवर दहशतवाद्यांची (terrorist) वक्रदृष्टी असल्याचे आज समोर आले आहे. दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांकडून शिर्डीमध्ये (Shirdi) रेकी केल्याची कबुली देण्यात आली. गुजरात एटीएसने (Gujrat ATS) अटक केलेल्या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील (Pakistan) दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती या तपासात पुढे आली आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत हे काय घडत आहे असा प्रश्न भक्तांच्या मनात उपस्थित झाला आहे. ()

Shirdi Sai Baba Temple
मुंबईत आता ट्रेन, बस अन् मेट्रोमधून प्रवास करताना भासणार नाही पैशांची गरज; जाणून घ्या

या रेकी प्रकरणामध्ये दहशतवाद्यांचे पाकिस्तानात दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचेही तपासातून पुढे आले आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय देवस्थान असल्याने याआधी देखील साई मंदिराला धमकीचे निनावी पत्र तसेच मेल देखील आले आहेत. या दहशतवाद्यांनी शिर्डीचे मूळचे रहिवासी आणि सध्या दिल्लीत राहत असलेल्या एका हिंदी चॅनेलच्या संपादकांच्या शिर्डीतील घरी आणि दिल्लीतील कार्यालयाचीही रेकी केल्याची कबुली देण्यात आली. या तपासादरम्यान दहशतवाद्यांकडून अवैध हत्यारे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

Shirdi Sai Baba Temple
व्हॉट्सअॅप स्टेटसने केला घात, मैत्रीणीच्या आईला युवकाने केली मारहाण

ही धक्कादायक बाब समोर आल्यावर शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. दुबई येथील अटक करण्यात आलेले अतिरेकी मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी यांनी ही रेकी केल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत 6 मौलवींसह 2 जणांना म्हणजे एकून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणानंतर जगप्रसिद्ध साईमंदिराच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्याबरोबर सुरक्षा यंत्रणाही वाढविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com