Mahayuti Manifesto For Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीने संकल्पपत्र प्रसिद्ध केले आहे. हे संकल्पपत्र राज्यातील सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून दीड हजारांवरुन वाढवून 2100 केले जातील, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, वृद्धांना पेन्शन तसेच शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबतची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी कृषी कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत 12 हजारांवरुन 15 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले असून एमएसपीवर 20 टक्के सबसिडी देण्याची घोषणाही केली आहे. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
लाडली बहीण योजनेची रक्कम 1500 वरुन 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलीस दलात तैनात करण्याचे आश्वासन दिले आहे.
कर्जमाफी आणि किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 15 हजार रुपये मिळतात, पूर्वी ही रक्कम 12 हजार होती. याशिवाय, एमएसपीवर 20 टक्के सबसिडी देण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा दिला जाणार.
वृद्ध पेन्शन धारकांना 1500 वरून 2100 रुपये मिळणार.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे.
25 लाख रोजगार निमिर्ती, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार.
राज्यातील ग्रामीण भागात 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधले जाणार.
अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये पगार आणि सुरक्षा देण्याचे आश्वासन देण्यात आले असून त्यांचे मासिक वेतन 15,000 रुपये करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
वीज बिलात 30 टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर दिला जाणार.
सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘सादर केले जाणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.