गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे आज 10 जुलै, रविवार देखील हवामान खात्याने महाराष्ट्रातील रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरीसाठी रेड अलर्ट दिला आहे. मुंबई आणि कोकण लगतच्या समुद्रात भरती-ओहोटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. (Maharashtra Two policemen save a man life by playing with his life VIDEO)
अशा परिस्थितीत पुण्याजवळील दोन पोलीस हवालदारांनी आश्चर्यकारक कामगिरी करत दोन जणांचे प्राण वाचवले आहेत तर या दोन पोलिसांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्याजवळील शिवणी परिसरातील बागुल उद्यानाजवळ ही घटना घडली आहे. येथे एक व्यक्ती पुराच्या पाण्यात बुडत होती.
याची माहिती मिळताच दत्तवाडी, पुणे येथील पोलीस कर्मचारी सद्दाम शेख आणि अजित पोकरे यांनी जीवाची पर्वा न करता त्या जोरदार प्रवाहामध्ये उडी मारली आणि सर्वांनी मिळून त्या व्यक्तीचा जीव वाचवला.
या घटनेशी संबंधित व्हिडिओ क्लिप राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या खाजगी अकाउंटवरून ट्विट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हजारो लोक या व्हिडीओला प्रतिक्रिया देऊन या दोन पोलिसांच्या धैर्याचे आणि शौर्याचे कौतुक करत आहेत.
जीवावर खेळत दोन पोलिसांनी एका व्यक्तीचा वाचवला जीव
सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “दत्तवाडी, पुणे पोलीस कर्मचारी सद्दाम शेख आणि अजित पोकरे यांनी एका व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. शिवणे येथील बागुल उद्यानाजवळ जोरदार प्रवाहामध्ये ते वाहून जात होते तर जीवावर खेळून त्यांनी दाखवलेले शौर्य अप्रतिम आहे! आम्हाला महाराष्ट्र पोलिसांचा सार्थ अभिमान आहे!” या दोन पोलिसांच्या शौर्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात सध्या पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सर्व जिल्ह्यांना अलर्ट मोडवर ठेवले असून ते स्वतः पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत.
त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व संभाव्य तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि बाधित भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात NDRF च्या 17 तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.