स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्र अव्वल

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशातील प्रत्येक व्यक्तीचा उत्सव
Hasan Mushrif
Hasan MushrifDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने केंद्र व राज्य शासनाच्यावतीने आयोजित कार्यक्रमांचे मुल्यांकन केंद्र शासनाच्यावतीने केले जाते. यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशातील प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येकाच्या मनाचा उत्सव आहे. त्यामुळे त्याचा महोत्सव पुढेही सुरू ठेऊन महाराष्ट्राचे प्रथम क्रमांकाचे स्थान पुढेही टिकून राहिल, असा विश्वास ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त करून सर्व अधिकारी, कर्मचारी व लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. (Maharashtra tops in the nectar festival program of independence )

ग्राम विकास व पंचायतराज विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध पातळीवर उपक्रम घेण्यासंदर्भातील नियोजन केले होते. त्यामध्ये ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या उमेद अभियान, ग्रामीण गृहनिर्माण विभाग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन, पंचायत विस्तार कायदा (पेसा), ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, प्रशिक्षण संस्था, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा विविध स्तरावरील यंत्रणांव्दारे कार्यक्रमांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी सप्टेंबर 2021 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत येणाऱ्या दिनविशेष, सप्ताह, पंधरवडा इ. मध्ये करण्यात येत आहे.

Hasan Mushrif
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द होण्यास जबाबदार कोण? मनसेने केला आरोप

महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास‍ व पंचायतराज विभागाने भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या https://indiaat75.nic.in या संकेतस्थळावर 2 लाख 49 हजार 123 कार्यक्रमांचे आयोजन करून देशात प्रथम क्रमांकावर येण्याचा मान मिळविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुध्दा राज्याच्या ग्राम विकास व पंचायतराज विभागाचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात 41 हजार 440 कार्यक्रमांसह दुसऱ्या तर 28 हजार 903 कार्यक्रमांसह झारखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Hasan Mushrif
शिवसेनेने माझा विश्वासघात केला: संभाजीराजे छत्रपती

या उपक्रमात ग्रामपंचायत स्तरावर 2 लाख 41 हजार 471, पंचायत समिती 5209 तर जिल्हा परिषदांचे 2443 असे एकूण 2 लाख 49 हजार 123 कार्यक्रम छायाचित्रासह भारत सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड झाले आहेत. त्यात राज्यातील अहमदनगर, पुणे, लातूर हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. एकूण 27 हजार 898 ग्रामपंचायतींपैकी 26 हजार 200 ग्रामपंचायतींची माहिती या पोर्टलवर अपलोड झाली आहे. उर्वरित ग्रामपंचायतीची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त केले आहे. राज्यात 27 हजार 898 ग्रामपंचायतींपैकी 27 हजार 892 ग्रामपंचायतींमध्ये नोडल अधिकारी नियुक्त केले असून, 5067 समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यातही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ उत्तराखंड 2020 समित्यांसह दुसऱ्या स्थानावर तर 1916 समित्यांच्या स्थापनेसह राजस्थान तिसऱ्या स्थानावर आहे.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री राजेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली राज्यस्तरावरुन राज्य नोडल अधिकारी डॉ. राजाराम दिघे, संचालक-ग्रामीण गृहनिर्माण हे काम पाहत असून त्यांचे समवेत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री अनंता मुदगले, ग्रामीण गृहनिर्माण कक्षातील श्री. संघरत्न सोनोणे व श्री संघपाल चव्हाण हे काम पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com