समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनापूर्वीच आशिष देशमुखांनी घेतली टेस्ट ड्राइव,पाहा व्हिडिओ

महाराष्ट्रांमधील 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडणारा द्रुतगती मार्ग तयार झाल्यानंतर नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सध्याचा 16 तासांवरून आठ तासांपर्यंत कमी होणार आहे.
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग हा एक मोठा प्रकल्प सुरू आहे. पण मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गाच्या उद्घाटनापूर्वीच काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) महामार्गावर चारचाकी गाडी चालवताना दिसले आहेत. देशमुख यांनी त्यांच्या 200 किमी ड्राईव्हचा एक व्हिडिओ त्यांच्या फेसबुकवर शेअर केला आहे. त्यांनी नागपूर ते वाशीम प्रवास केल्याचे सांगितले आहे. व्हिडीओमध्ये समृद्धी महामार्गावर काँग्रेस नेते त्यांच्या बीएमडब्ल्यूमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. जनतेला या महामार्गाचा लाभ घेण्याचे आवाहन देशमुख यांनी व्हिडिओमध्ये केले आहे. (Maharashtra Samruddhi Mahamarg News)

काँग्रेस नेते आशिष देशमुख म्हणतात, ‘समृद्धी महामार्गामुळे सर्वांची समृद्धी होणार असून, विदर्भाच्या विकासामध्ये मोठा हातभार लागणार आहे.’ बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम नागपूर ते सेलूबाजारपर्यंत पूर्ण झाले आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हा महामार्ग जनतेसाठी खुला करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 2 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. कोणत्याही स्थितीत जून 2023 रोजी हा संपूर्ण महामार्ग पूर्ण होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व महाव्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली आहे.

नागपूर ते शिर्डी दरम्यानचा महत्त्वाकांक्षी हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग टप्पा 1 मे 2022 पासून वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) या द्रुतगती मार्गाच्या पुढील बांधकामाचे काम हाती घेत आहे. एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने कामगार साइट सोडून जात आहेत. राज्याच्या ईशान्येकडील भागातील परिस्थिती गंभीर आहे. यामुळे प्रकल्पावर विपरीत परिणाम झाला आहे. याशिवाय, कोरोना विषाणुवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने लादलेल्या निर्बंधाचे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

Samruddhi Mahamarg
पालघरमध्ये केमिकल प्लांटला आग, एकाचा मृत्यू, परिसरात धुराचे लोट

दरम्यान, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग नकाशामध्ये 50 उड्डाणपूल, पाच बोगदे, 300 वाहने अंडरपास आणि 400 पादचारी अंडरपास यांचा समावेश आहे. 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावे यांना जोडणारा द्रुतगती मार्ग तयार झाल्यानंतर नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास 16 तासांवरून आठ तासांपर्यंत कमी होणार आहे. सध्या, नागपूरला जाण्यासाठी NH3 (मुंबई-धुळे) आणि नंतर NH6 (धुळे-नागपूर) ने 800 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com