Maharashtra Rain: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी यलो अलर्ट

Maharashtra Rain News: गेल्या दहा वर्षात ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
 Maharashtra Rain News
Maharashtra Rain NewsDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 17 आणि 18 ऑक्टोबरला म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह (Mumbai) आजूबाजूच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सोमवरी आणि मंगळवारी मुंबईला यलो अलर्ट जारी केला आहे.

  • यंदा पावसाची विक्रमी नोंद

यंदा परतीच्या पावसाने (Rain) राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला आहे. गेल्या दहा वर्षातील ऑक्टोबर महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून लवकरच महाराष्ट्रातून परतणार आहे. मान्सून परतण्यापूर्वी सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट जारी केला आहे.

  • राज्यातील 15 जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद

ऑक्टोबर महिन्यात गेल्या पाच वर्षांत यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अवघ्या बारा दिवसांतच राज्यातील 15 जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला असला तरीही तो राज्यातील उत्तर महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागातून निघाला आहे. पण कोकण व मध्य महाराष्ट्रात मात्र त्याचा मुक्काम वाढल्याने ऑक्टोबरमध्ये विक्रमी पावसाची नोंद होत आहे.

 Maharashtra Rain News
Raj Thackeray: फडणवीस म्हणजे फळ्यावर लिहिणारे! राज ठाकरेंनी सांगितला अर्थ...

या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस तसेच भाजीपाला पिकाचा समावेश आहे. दुसरीकडे शेतातील भात पीक झोपल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com