Maharashtra Politics: काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा 'घरोबा' उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरणार का?

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे.
Maharashtra Politics: काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा 'घरोबा' उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरणार का?
Uddhav ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यातील राजकीय फाइट जोरदार होणार हे आता नक्की होऊ लागलं आहे. विविध राजकीय मुद्यांवरुन महाविकास आघाडी महायुती सरकारला घेरत आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला मिळून सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र निवडणूक निकालानंतर भाजपपासून शिवसेनेने फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर घरोबा करत सरकार स्थापन केले होते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांना मिळून 161 जागा मिळाल्या होत्या, ज्यामध्ये भाजपने 105 तर शिवसेनेला 56 जागा जिंकल्या होत्या. तथापि, युती तोडून मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संग करण्याचा निर्णय त्यावेळी निर्णायक ठरला होता.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व क्षमतेवर वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले जातात. सरकारमध्ये असताना सरकारी कामकाजातील त्यांची असमर्थता आणि संसदीय कार्यपद्धतींबद्दल त्यांची समज याबद्दल वारंवार बोलले गेले. मुख्यमंत्री कार्यालयात क्वचितच भेटणे, विधीमंडळातील त्यांची उपस्थिती हे मुद्दे त्यांच्यासाठी मारक ठरले. एवढचं नाहीतर त्यांच्याच पक्षातील मंत्री, आमदारांनी बंड करुन त्यांच्यापासून फारकत घेतली.

Maharashtra Politics: काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा 'घरोबा' उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरणार का?
Maharashtra Politics: शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरुन विरोधक गलिच्छ राजकारण करतायेत का?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राजकीय रणनीती

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उद्धव यांच्या अगतिकतेचे केवळ भांडवल केले. उद्धव यांनी आपल्या स्वत:च्या मतदारराजाला आवाहन करुनही त्यांच्या पक्षाला फारसा पाठिंबा मिळाला नाही. मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेने केवळ शिवसेनेला कमजोरच केले नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबरच्या युतीतील सर्वात कमकुवत पक्ष ठरवले. लोकसभा निवडणुकीदरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत उद्धव यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयाचा फटका त्यांनाच बसला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com