सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण शिवसेनेतील बंडालामुळे चांगलेच गाजत आहे. यातच आज ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स पाठवले असून उद्या त्यांची चौकशी होणार आहे. यासह राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. (Maharashtra Political Crisis news)
* संजय राऊतांना ईडीचं समन्स
संजय राऊत यांना जमीन घोटाळ्यात संबंधित समन्स बजावण्यात आलं आहे. याआधी त्यांची दादरस्थित मालमत्तेची चौकशी करण्यात आली होती. काही ठिकाणी छापे टाकून ईडीने मालमत्ताही ताब्यात घेतली. राऊत यांच्या पत्नीच्या नावे झालेल्या व्यवहारांवरही संचलनालयाची नजर आहे. सध्या राज्यात सत्तासंघर्ष टोकाला गेला आहे. यातच सेनेचे मंत्री अनिल परब यांची सलग तीन दिवस ईडी चौकशी पार पडली. यानंतर आता संजय राऊत यांचा पाय खोलात गेल्याने सेनेच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत
* एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला, सरकार अल्पमतात
राज्यातील सत्तासंघर्षात मोठी घडामोड समोर आली आहे. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याच दावा केला आहे. या याचिकेत 38 शिवसेना आमदारांनी व अपक्ष आमदार असे 51 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी आव्हान दिले आहे.
* मंत्र्याकडील खातेवाटपात बदल
एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.