Raj Thackeray Sabha: आज मुंबईत ठाकरेंची गर्जना; मुंबई महापालिका निवडणुकीसाठीही आखणार रणनीती

राज ठाकरे आज मनसैनिकांना संबोधित करणार आहे.
Raj Thackeray Sabha
Raj Thackeray SabhaDainik Gomantak
Published on
Updated on

आज मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा गर्जना करणार आहे. राज ठाकरेंच्या निशाण्यावर यावेळी कोण असेल यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. गेले काही दिवसात राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्यात पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत शांतता ठेवतांना दिसले. कुठल्याही गोष्टीत त्यांनी आपली प्रतिक्रीया नोंदवली नाही. पण आज मनसे गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे.

दरम्यान राज ठाकरे आज मनसैनिकांना संबोधित करणार आहे. या सभेत राज ठाकरे नक्कीच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील काही दिवसातचं मुंबई (Mumbai) महापालिकेच्या निवडणुक होणार असल्याची चर्चा आहे. तरी या निवडणुकीत राज ठाकरेंची काय भुमिका असणार याबाबतची उत्सुकता मनसैनिकांना लागली आहे.  

गेले काही दिवसात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री राज ठाकरे आणि मनसे अध्यक्ष एकाच फ्रेममध्ये दिसुन आले. तरी ही फ्रेम म्हणजे महाराष्ट्रातील (Maharashtra) नव्या राजकीय समीकरणाची नवी नांदी आहे का अशी चर्चा होत आहे.

Raj Thackeray Sabha
Sambhaji Chhatrapati:...तर उठाव होणारच, संभाजीराजेंनी दिला राज्यपाल हटाओचा नारा

गेले काही दिवसात कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचे वक्तव्य, हर हर महादेव सिनेमाचा वाद, राहुल गांधींची (Rahul Gandhi) महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) असे अनेक मुद्दे गाजत आहेत. या मुद्द्यांवर राज ठाकरे (Raj Thackeray) आपले निर्भिड मत मांडतील का याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com