Maharashtra Monsoon Session: विधानसभेला अध्यक्ष कधी मिळणार?

Maharashtra Monsoon Session: राज्यपालांची अध्यक्ष निवडणुकीत काय भूमीका असणार याचे देखील कुतूहल आहे.
Maharashtra Monsoon Session
Maharashtra Monsoon SessionDainik Gomantak
Published on
Updated on

नागपूर : महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर संपुष्टात आलेल्या दोन दिवसीय अधिवेशनात मिळाले नाही. त्याचबरोबर भाजपाचे 12 आमदार निलंबित असताना राज्यपालांची अध्यक्ष निवडणुकीत काय भूमीका असणार याचे देखील कुतूहल आहे. (Maharashtra Monsoon Session: When will the Assembly get a Speaker)

शिवसेनेचा मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री, मात्र काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाचे काय? महाविकास आघाडी सरकारला दोन दिवसाच्या अधिवेशनात काँग्रेसचा अध्यक्ष द्यायला हरकत नव्हती मात्र मतदान ओपन बॅलेटने हवे होते. नियमानुसार हे मतदान मात्र गुप्त घ्यावे लागणार हे लक्षात आल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत ह्यावर तिन्ही पक्षांमध्ये बरीच चर्चा झाल्याचे कळते आहे. ऑल वेल हे सतत सांगत असणाऱ्यांना ही गुप्त मतदानाची रिस्क घ्यायची नव्हती असे कळत आहे.

Maharashtra Monsoon Session
कोरोनाच्या संकटात ST महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

एकीकडे मतदानाच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील ह्यांनी अपक्ष आमदारांच्या मतदानाची चाचपणी केली असून या अगोदर कॉंग्रेसकडे पद होतं आणि आताही आपलाच अध्यक्ष बसावा ह्यासाठी कॉंग्रेस आग्रही आहे. मात्र जेव्हा एकंदरीत गुप्त मतदानच घ्यावे लागेल तेव्हा हे लक्षात आले की, मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेतृत्वाशी दिल्लीत देखील यावर चर्चा केली होती. आणि अध्यक्षपदाची निवडणूक सध्या दोन दिवसाच्या अधिवेशनात न घेण्याचे ठरले.

Maharashtra Monsoon Session
भाजप आणि शिवसेनेची मैत्री होणार का ? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलं उत्तर

अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया

विधीमंडळ अधिवेशन सुरु असतानाच अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी लागते

विधीमंडळात गुप्त मतदानानीच निवडणूक हा नियम

कोणत्याही आमदारांच्या निलंबनामुळे ती थांबू शकत नाही

सदनात असणाऱ्या आमदारांनाच मतदान करता येते

त्यामुळे आता एकंदरीत असे लक्षात येतेय की, अध्यक्ष निवडणूक ही थेट हिवाळी अधिवेशनातच घेता येणार आहे. ह्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन झाले. अध्यक्ष निवडीत राज्यपालांची नक्की काय भूमिका असणार? काय नियम असणार हे येत्या निवडणुकीला समजेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com