…तर एक दिवस आत्महत्येची वेळ येईल हा शब्द लक्षात ठेवा : नितीन गडकरी

ऊस शेतीवरुन सोलापूरकरांना दिला गंभीर इशारा
Nitin Gadkari
Nitin GadkariDainik Gomantak
Published on
Updated on

सोलापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सोलापुरातील शेतकऱ्यांना ऊस शेतीवरुन शेतकऱ्यांना गंभीर ईशारा दिला असून शेती पद्धती बदली नाही तर एक दिवस आत्महत्येची वेळ येईल हा शब्द लक्षात ठेवा असे वक्तव्य केलं आहे.(Nitin Gadkari gave a serious warning to the people of Solapur from sugarcane farming)

Nitin Gadkari
गृहमंत्र्यांनी काढला लाऊडस्पीकर वादावर तोडगा

या पुढे बोलताना ते म्हणाले की, “सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्रशिंग होतंय, पण हा ऊस असाच जास्त लावत राहाल तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द लक्षात ठेवा,” असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.ते सोलापूरमध्ये बोलत होते.

Nitin Gadkari
निवडणुका झाल्या तर काय निकाल लागतील? शरद पवारांनी दिलं उत्तर

शिवाय सोलापूर जिल्हा आणि तेथील परिसर देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता असलेल्या या रस्ते प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास आणि अपघातांच्या घटना कमी होण्यास तसेच पर्यावरणाचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असे ही ते यावेळी म्हणाले. नितीन गडकरी म्हणाले, “आज पाणी हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण पाणी उपलब्ध केलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न अडीच पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. ते पाणी जर ड्रीपने दिलं तर फारच चांगलं आहे. सोलापूर जिल्हा एकेकाळी दुष्काळी होता.

या वेळी मंत्री गडकरी यांनी 292 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी कारखानदारांना इशारा देताना म्हणाले कि, ऊसाचा दर कमी करता येणार नाही, कारण तुम्हाला राजकारण करायचं आहे. त्यामुळे ऊसाचा भाव तेवढाच द्यावा लागेल, मग काय स्थिती होईल ते बघा,” असं म्हणत नितीन गडकरी यांनी कारखानदारांना इशारा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com