Maharashtra Weather Updates
Maharashtra Weather UpdatesDainik Gomantak

Maharashtra Rain: मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राला उद्यापासून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Updates: उद्यापासून राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे.
Published on

राज्यात काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण केली होती. अशातच आता उद्यापासून म्हणजेच 23 जुलैपासुन राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील चार दिवस मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Updates news)

राज्यात मुंबईसह(Mumbai) कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसानंतर (Rain) गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.

Maharashtra Weather Updates
Maharashtra: बाळासाहेंबाच्या शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंचं 'मिशन 188'

* राज्याच्या काही भागात पावसाचा जोर कमी

बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसानं धुमकूळ घातला आहे. मात्र, कालपासून काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झालाआहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. दुसरीकडं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वरुणराजाने उघडीप दिल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच पावसाने उघडीप दिल्यानं शेतीच्या कामांनाही वेग आल्यानं बळीराजा सुखावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com