जरा भान राखून काम करा, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी भरला दम

विकासकामामध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण (Politics) आणू नये.
Maharashtra State Minister for Higher Technical Education Uday Samant
Maharashtra State Minister for Higher Technical Education Uday SamantDainik Gomantak

विकासकामामध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण आणू नये. मात्र या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रोटोकॉलच्या नावाखाली राजकारण करणे योग्य नाही. म्हणून त्या करिता निमंत्रण पत्रिकेमधून अनेक राजकिय पुढाऱ्यांची नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी निवडणूक लढविण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाही. मात्र ही जनतेची कामे आहेत, जरा भान राखून कामे कराववीत. म्हणून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी स्वत:वर आवर घालावा, असा इशारावजा दम महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षणमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी अधिकाऱ्यांनी दिला आहे. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी यावेळी गैरहजर होते.

दरम्यान, मागील अनेक वर्षे रखडलेल्या पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमात मंत्री सामंत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, पंचायत समिती सभापती संजय माने, उपसभापती उत्तम सामंत यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर अल्पबचत सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ९ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येणारी ही इमारत येत्या वर्षभरात पूर्ण करा, अशी सूचना देखील यावेळी मंत्रीमहोदयांनी केली आहे.

Maharashtra State Minister for Higher Technical Education Uday Samant
समीर वानखेडे -भाजप नेत्यांमध्ये भेट? नवाब मलिक करणार खुलासा

सामंत पुढे म्हणाले, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचं राजकारण करु नये. राजशिष्टाचार काय असतो हे आम्हालाही चांगलंच माहिती आहे. अधिकारी लोक हे जनतेचे सेवक असतात याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे. त्यांनी कोणत्याही प्रकारे जनतेला वेठीस धरु नये. त्याचबरोबर एका राज्याचे मंत्री म्हणून आम्हाला काही अधिकार आहेत याचं भान ठेवा, असा इशारावजा दम यावेळी मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांनी भरला. मी राजशिष्टाचार विचार न करता कार्यक्रमाला उपस्थित राहतो. जनतेसाठी आजोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे माझे कर्तव्य आहे. मात्र इथे मी कोणत्याही प्रकराचा राजशिष्टाचार बघत बसत नाही. परंतु याबाबत अधिकाऱ्यांनी यावर कोणत्याही प्रकारे वेळ घालविण्याची वेळ नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com