समाजातील महिला आणि मुलींना समान हक्क मिळावेत यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवत असते. त्यातील एक म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेअंतर्गत, सरकार 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी खाते उघडण्याची सुविधा देत असते. या योजनेत पालक दरवर्षी दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. (Sukanya Samriddhi Account Updated News)
त्यांना या गुंतवणुकींमध्ये आयकर सवलतीचा लाभही मिळतो. यासोबतच मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिच्या अभ्यासासाठी आणि 21 वर्षांची झाल्यावर तिच्या लग्नासाठी आर्थिक मदत म्हणून वापरता येईल. हे खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये देखील उघडता येते.
परंतु, अनेक वेळा एका बँकेत सुकन्या समृद्धी खाते (Sukanya Samriddhi Yojana) उघडल्यानंतर ग्राहकांना ते खाते दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करायचे असते. या प्रकरणात, आपण ते दुसऱ्या बँकेत हस्तांतरितही करू शकता. कदाचित एखाद्या व्यक्तीला त्याचे जुने बँक खाते बंद देखील करावे लागेल. अशा स्थितीत खाते बंद झाल्याने त्याच्याशी संबंधित सुकन्या समृद्धी खातेही बंद होईल. अशा परिस्थितीत, खाते बंद करण्यापूर्वी, तुमचे सुकन्या समृद्धी खाते दुसर्या बँकेत हस्तांतरित करु शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही खाते पोस्ट ऑफिसमध्येही हस्तांतरित करू शकता.
नवीन बँकेत खाते हस्तांतरित करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला जुने SSY बँक खाते बंद करावे लागणार.
तुमचे खाते बँक ऑफ बडोदामध्ये असल्यास, जे बंद करून पंजाब नॅशनल बँकेत हस्तांतरित केले जाणार, तर सर्वप्रथम, तुम्हाला बँक ऑफ बडोदामधील खाते बंद करण्यासाठी अर्ज करावा लागेल.
अर्जामध्ये तुम्हाला ज्या बँकेत खाते हस्तांतरित करायचे आहे त्या बँकेचा पत्ता लिहा.
त्यावरती बँक तुमच्या माहितीची पडताळणी करेल. त्यानंतर खाते तेथे हस्तांतरित केले जाईल.
तर पोस्ट ऑफिससाठीही हा नियम पाळला जाईल.
बँक ऑफ बडोदा खात्यात जमा केलेली एकूण रक्कम डीडी किंवा चेकद्वारे पंजाब नॅशनल बँकेत हस्तांतरित केली जाणार
यानंतर तुम्हाला केवायसी तपशीलही द्यावा लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.