Cylinder Blast in Maharashtra
Cylinder Blast in MaharashtraDainik Gomantak

Cylinder Blast : शेजाऱ्याकडून आणलेल्या गॅस सिलिंडरचा झाला स्फोट; दोघांचा मृत्यू, चार जखमी

महाराष्ट्रातील पुण्यात गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे झालेल्या स्फोटात दोन ठार तर चार जण जखमी झाले आहेत.
Published on

महाराष्ट्रातील पुण्यात गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे झालेल्या स्फोटात दोन ठार तर चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून 40 किमी अंतरावर असलेल्या चाकण येथे ही घटना घडली. मृतांपैकी एक 19 वर्षीय तरुण असून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता, असे त्यांनी सांगितले. त्याने शेजाऱ्याकडून गॅस सिलिंडर आणला होता आणि बहुधा त्याच्या घरातील स्वयंपाकघरातील सिलिंडरला गळती आणि स्फोट झाला.

Cylinder Blast in Maharashtra
Mumbai To Panaji AC Bus: ख्रिसमसनिमित्त गोवेकरांना भेट, मुंबई ते पणजी एसी बससेवा; दर रेल्वे तिकीटापेक्षाही कमी

एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. या घटनेत चाकण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, किशोर आणि एका 95 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (ए) अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृत अल्पवयीन मुलावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, अशी धक्कादायक घटना रशियामध्ये काही दिवसांपूर्वी घडली होती. रशियाच्या सखालिन बेटावर पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. 20 लिटरच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने सदर इमारतीचा भाग कोसळल्याची तपास समितीने माहिती दिलीय. या घटनेत कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झालाय. त्याचबरोबर एक व्यक्ती अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती राज्यपालांनी दिलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com