‘महाराष्ट्र बंद’ रविवारी मध्यरात्रीनंतरच होणार सुरुवात

महाविकास आघाडीकडून लखीमपूर (Lakhimpur) घटनेनंतर 11 तारखेला महाराष्ट्र बंदला दिली हाक.
Maharashtra
Maharashtra Dainik Gomantak
Published on
Updated on

महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी महाराष्ट्र बंद ची घोषणा केली आहे. या बंदला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशमधील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र(Maharashtra) बंदचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्वांनी या बंदला पाठिंबा द्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. देशाचा पोशिंदयाला चिरडल्यानंतर याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने हा आक्रमक पवित्रा उचलला आहे. महाराष्ट्र बंद हा येत्या सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही (NCP, ShivSena and Congress )या महाविकास आघाडीने याला सहमती दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक (Essential) सेवा सोडून इतर सर्व संपूर्ण दिवसभर बंद राहिल. या बद्दलची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी दिली. हा पक्षाच्या वतीने बंद आहे. सरकारच्या वतीने नाही, असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra
सिंधुदुर्गात आज लोकार्पण झालेल्या विमानतळाचे नाव 'चिपी' का?

देशातील शेतकऱ्यांचा (Farmer) पाठीशी शिवसेना ही नेहमीच उभी राहिली आहे. यामुळे या बंदमध्ये आम्ही सहभागी असणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लखीमपूर येथील शेतकरी आंदोलन चिरडले त्यावेळी भाजपची कशी मानसिकता आहे हे सर्वांच्या समोर आले. भाजप हे जनरल डायरच्या भूमिकेत दिसून आले, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

शेतकऱ्यांवर झालेल्या या घटनेनंतर राज्यातील जनतेमध्ये तीव्र संताप असून सोमवारच्या बंदमध्ये त्या दिसून येतीलच. असा विश्वास शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रपरिषदे मध्ये केला.

Maharashtra
'महाराष्ट्र संकटात असेल तर आम्ही कर्ज काढून समस्या सोडवू'

संजय राऊत (Sanjay Raut)म्हणाले, होणाऱ्या बंदमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने उभी असणार आहे. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांसोबत तसेच संविधानाची हत्या केली. देशातील अन्नदात्याला संपविण्याचे षडयंत्रच सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी भक्कमपणे सदैव आहे. आणि आता हा बंद कडकडीत पाळून ते दाखवून देऊ. नागरिक हे स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळतील. अत्यावश्यक सेवा यामध्ये वगळण्यात आल्या आहेत.

नवाब मलिक (Nawab Malik)म्हणाले, लखीमपूरची आणि जलियानवाला बाग हत्याकांड या घटना सारख्याच आहेत. असे आमचे नेते शरद पवार यांनी म्हटलेच आहे. शेतकऱ्यांची हत्या घडवणाऱ्यांना बंद पाळून चोख उत्तर दिले जाईल. रविवारी मध्यरात्रीनंतर या बंदला सुरूवात होईल.

सचिन सावंत (Sachin Sawant)म्हणाले.लखीमपूर घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. भाजप हे मारेकऱ्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com