Maharashtra: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बंडखोर गटातील नेत्याचा मोठा दावा, जाणून घ्या

Maharashtra Cabinet: महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेच्या बंडखोर गटातील एका सदस्याने मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असल्याची माहिती दिली आहे.
Devendra Fadnavis & Eknath Shinde
Devendra Fadnavis & Eknath ShindeDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Cabinet Expansion Date: महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी आजतागायत राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेच्या बंडखोर गटातील एका सदस्याने मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार 15 ऑगस्टपूर्वी होईल, असे बंडखोर शिवसेना गटातील एका प्रमुख सदस्याने शुक्रवारी सांगितले. राज्यात नवे सरकार स्थापन होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 30 जून रोजी शपथ घेतली. सध्या त्यांच्याशिवाय राज्य मंत्रिमंडळात एकही सदस्य नाही. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार 15 ऑगस्टपूर्वी होणार असल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते सामंत म्हणाले की, 'प्रभारी मंत्री स्वातंत्र्यदिनी आपापल्या जिल्ह्यात तिरंगा फडकवतील. प्रत्येक जिल्ह्याच्या विकास योजना आणि संबंधित बाबींसाठी प्रभारी मंत्र्यांची नियुक्ती केली जाते. ही एक अतिरिक्त जबाबदारी आहे, जी मंत्री परिषदेच्या सदस्यांना दिली जाते.'

Devendra Fadnavis & Eknath Shinde
Maharashtra: शिंदे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'Corona नियमांचं उल्लंघन करणाऱ्या...'

राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर निशाणा साधला

दुसरीकडे, विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबावर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला फटकारले आहे. अभ्यासासाठी योग्य वेळ मिळत नाही का असा सवाल त्यांनी केला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने म्हटले आहे की, 'शिंदे कॅम्प आणि भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तार "लवकरच" केला जाईल असे वारंवार सांगितले आहे, परंतु अद्याप काहीही झाले नाही.'

Devendra Fadnavis & Eknath Shinde
Maharashtra OBC Reservation बाबत SC चा मोठा निर्णय, '365 ठिकाणी आरक्षणाविना निवडणुका'

तसेच, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, 'मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची 20 हून अधिक वेळा घोषणा करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची आमची मागणी आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com