11 मार्च ला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, यावेळीही नागपूर नाहीच

यावेळीही नागपूर नाहीच, राज्याचे अधिवेशन हे 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत मुंबई येथिल विधान भवन येथे होणार आहे.
Maharashtra Budget 2022-23
Maharashtra Budget 2022-23Dainik Gomantak
Published on
Updated on

1 फेब्रूवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर झाला, आणि आता राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचही बिगुल वाजला. राज्याचे अधिवेशन हे 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत मुंबई येथिल विधान भवन येथे होणार आहे. तर राज्याचा आर्थसंकल्प हा 11 मार्च रोजी सादर होार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज माध्यमांना सांगितले.(Maharashtra Budget 2022-23)

Maharashtra Budget 2022-23
Sanjay Raut Press Conference: 'हा ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है'

माध्यमांशी बोलतांना मंत्री अनिल परब म्हणाले की, “महाराष्ट्र (Maharashtra) विधान मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेण्याचं आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलं आहे. तर महाराष्ट्राचा राज्याचा अर्थसंकल्प हा 11 मार्च रोजी विधानसभेत व विधानपरिषदेत मांडला जाणार आहे.”

“या कामकाजात प्रलंबित असलेले एक बील आणि पुढील काही दिवसांत जी बिलं येतील, अशी अपेक्षित असलेली बिलं ही मांडली जातील. तसेच अर्थसंकल्पावरील (Budget) ज्या मागण्या असतील, त्यासाठी पाच दिवसांची चर्चा देखील मान्य करण्यात आलेली आहे.” अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

यावेळेही नागपूर नाहीच

नागपूर (Nagpur) करारा नुसार विधिमंडळाचे एक अधिवेशन हे नागपूरमध्ये घेण्याची तरतूद आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने याला दोन वर्षांपासून करोनाचे नाव पुढे करून छेदच दिला आहे. काही दिवसापूर्वी अधीवेशनाची तारिख जाहीर केली जाते, मात्र तारीख जवळ येताच वेगवेगळी कारण पुढे करून नागपूरचे अधिवेशन रद्द केले जाते. ही परंपरा दोन वर्षांपासून सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com