महिला फिल्मी स्टाईलमध्ये करायच्या ट्रेनमधून दारूची तस्करी

धक्कादायक बाब म्हणजे या महिला रेल्वेतील चेन ओढून दारूची तस्करी करत असत.
Smuggling of Liquor in Trains
Smuggling of Liquor in TrainsTwitter
Published on
Updated on

मुंबई: गुजरातमधील वापीमध्ये पश्चिम रेल्वेने ( RPF) मोठी कारवाई करत गाड्यांमधून होणारी दारूची तस्करी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी आरपीएफने 12 महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून शेकडो दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या महिला रेल्वेतील चेन ओढून दारूची तस्करी करत असत.

गुजरात आणि महाराष्ट्रामधील दमण आणि सिल्वासा ही एकमेव ठिकाणे आहेत जिथे दारूवर बंदी नाही. त्यामुळे येथून गुजरात आणि महाराष्ट्रात दारू आणणे खूप सोपे आहे आणि रेल्वे हे सर्वात मोठे साधन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वापी ते बागवाडा दरम्यानच्या प्रवासी गाड्यांमध्ये विनाकारण चेन पुलिंग होत असल्याच्या तक्रारी आरपीएफकडे येत होत्या.

Smuggling of Liquor in Trains
लाज वाटली पाहिजे म्हणत; शाहरुखच्या समर्थनार्थ राऊतांनी दिलं ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर

या तक्रारी गांभीर्याने घेत आरपीएफने गुप्त पाळत ठेवण्यास सुरुवात केली. यादरम्यान आरपीएफच्या काही महिला वापी-बागवाडा दरम्यानच्या ट्रॅकजवळ अवजड सामान घेऊन जाताना दिसल्या. त्याच्याकडे संशयाच्या आधारे चौकशी केली असता, त्याच्याकडून वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवलेल्या अवैध दारूच्या शेकडो बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरपीएफने 12 महिलांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 1536 अवैध दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

Smuggling of Liquor in Trains
धक्कादायक! लाखासाठी आईनेच केला 4 वर्षाच्या मुलाचा सौदा

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, या महिलांनी चौकशीदरम्यान उघड केले की, या अवैध दारूच्या धंद्यात सामील असलेली एक महिला वापी स्थानकावरून ट्रेनमध्ये बसायची आणि ट्रेन वापी-बागवाडा सेक्शनमध्ये येताच ट्रेनची चेन ओढायची. यानंतर आधीच दारू तस्करी करणाऱ्या बाकीच्या महिला रेल्वेत चढायच्या आणि त्याच पद्धतीने त्यांचा अवैध दारूचा धंदा सुरू होता. याप्रकरणी आरपीएफ सध्या अधिक तपास करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com