मागील 48 तासांपासून महाराष्ट्रात पावसाने(Maharashtra Rain) थैमान घातले आहे, संपूर्ण राज्यभर कोसळत असणाऱ्या पावसाने(Heavy Rains) अर्ध्या राज्याला जायबंदी केले आहे. कुठे पूर, कुठे खचलेला रस्ता तर कुठे कोसळलेली दरड (Landslide) या सगळ्या घटनांनी राज्यात मागील 48 तासात राज्यात आतापर्यंत एकूण 129 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Floods In Maharashtra)
कोल्हापूर(Kolhapur), सातारा(Satara) अन् सांगलीला(Sangali) पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला असून पुण्याच्या घाटमाथ्यावरही जोरधार सुरू आहे. या जिल्ह्यातील एकूण 84,452 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Heavy Rain Maharashtra)
महाराष्ट्रातील मृत्यूची संख्या गेल्या 48 तासांत 129 वर पोहोचली आहे. बहुतेक मृत्यू रायगड आणि सातारा जिल्ह्यात झाले आहेत भूस्खलन वगळता अनेक लोक पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मृत्यूची संख्या 27 असून रायगड जिल्ह्यातील महाड तहसीलच्या तलाई गावाजवळ गुरुवारी सायंकाळी दरडी कोसळली. एनडीआरएफचे पथक आणि स्थानिक अधिकारी महाडमध्ये बचावकार्यात कार्यरत आहेत.(Landslides in Maharashtra: 129 killed so far in tha mayhem)
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळये गावावर शोककळा पसरली आहे. तेथे गुरुवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत 38 नागरिकांचा मृत्यू झाला, तर किमान 40 ग्रामस्थ मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. दुसरी दरड दुर्घटनाही रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात घडली. केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी येथे दरडी कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला. त्यात केवनाळे येथील सहा, तर सुतारवाडी येथील पाच जणांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे.
पश्चिम-मध्य महाराष्ट्रालाही अतिवृष्टीने तडाखा दिला. महाबळेश्वरमध्ये 24 तासांत देशातील सर्वाधिक 590, तर पुणे जिल्ह्यातील ताम्हिणीत 470 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोल्हापूर, सांगली, पुणे आदी जिल्ह्यांत अनेक नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. काही नद्यांनी पात्र सोडले आहे. कोल्हापूर, सांगलीत महापुराची स्थिती आहे. विदर्भातील गोंदिया, अकोला आणि मराठवाड्यातील परभणी, नांदेडलाही पावसाने झोडपून काढले.
राज्यसरकारकडून 5 लाखांची मदत
तर आता राज्यसरकारने दरड कोसळल्यामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या बद्दल शोक व्यक्त करत आर्थिक मदतीची घोषणा केली आहे .
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.