रेल्वेच्या मदतीला आली लालपरी

कसारा घाटामध्ये दरड कोसळून अर्धा तास रेल्वे (Railway) अडकली होती.
रेल्वेच्या मदतीला आली लालपरी
रेल्वेच्या मदतीला आली लालपरीDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: महाराष्ट्रात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडून घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कसारा घाटामध्ये दरड कोसळून अर्धा तास रेल्वे (Railway) अडकली होती. तेव्हा त्यातील प्रवाशांना दुसऱ्या दिवशी सकाळी होण्याआधी लालपरिने व्यवस्थितरित्या त्याच्या स्थळी पोहोचवले. 22 जुलैला कोकणबरोबरच मुंबई शहरात मुसळधार पाऊस पडला. तसेच रेल्वे (Railway) रुळाखालचा मलबा पण्यासोबत वाहून गेल्यानंतर या घाटात दरड कोसळली होती. यामुळेच एक्स्प्रेस गाड्या अर्ध्या रस्त्यातमध्ये थांबवल्या,परंतु रेल्वे स्टेशचे मास्तर आणि कल्याणमधील एसटीचे डेपो मॅनेजर यांच्या महत्वपूर्ण कार्यामुळे अतिमुसळधार पावसात अडकून असलेल्या प्रवाशाना सुरक्षितपणे त्यांच्या स्थळी पोहोचविण्यात लालपरीने मदत केली. यासाठी कल्यान व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.

रेल्वेच्या मदतीला आली लालपरी
दिल्लीत महाराष्ट्र सदनाला आग

अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसामुळे इमारती कोसळल्या तर कोकणमधीळ अनेक गावांचे संपर्क तुटले. तसेच मुंबई शहराच्या रस्त्यावर तर पाणी भरून वाहले. अशाबातम्या वाचायला मिळत असतानाच कसारा येथे रेल्वे रुळावर दरड कोसळल्याची बातमी आली. यामुळे रेल्वे वाहतुक खोळंबली. तर अनेक लांबच्या प्रवाशी गाड्या मधेच थांबल्या. या दरम्यान एसटीचे वेळापत्रक बघत, कल्यान रेल्वे स्टेशन मास्तरांनी प्रसंगावधान दाखवून एसटी डेपो मॅनेजरला कॉल केला, नंतर त्यांना बस सेवा देण्याची विनंती केली. यावर विजय गायकवाडांनी थोडाही विलंब न करता मदत कर्णीचा निर्णय घेतला. यामुळे अडकलेले हजारो प्रवाशी त्यांच्या स्थानी सुरक्षित पोहोचले. यामुळे गायकवाडांचे भरपूर कौतुक केले आहे.

रेल्वेच्या मदतीला आली लालपरी
Konkan Floods: 9 लाखाची रोकड घेवून चिपळूण आगारप्रमुख 9 तास बसच्या टपावर

या मदत कार्यात कसारा इगतपुरी जवळच असलेल्या डेपोमधील बसची खूप मोठी मदत झाली आहे. यात शहापूरमधी डेपोने महत्वाची कामगिरी बजावली आहे. या डेपोमधून 28 बस मदतीसाठी दिल्या होत्या. यावेळी गायकवाडांना या आधी सुद्धा अनुभव असल्याने त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य पार पाडले.

रेल्वेच्या मदतीला आली लालपरी
Maharashtra Floods: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सातारा दौरा रद्द

विभाग नियंत्रक विनोद भालेराव, तसेच विभागीय वाहतूक अधिकारी रमेश बांदल यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे कसारा घाटात यशस्वी कामगिरी केली. रात्रभर ही कामगिरी सुरूच होती. तसेच फोनद्वारे रेल्वे अधिकाऱ्यांचे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे संपर्क सुरूच होते. सकाळ होण्याआधीच येथील प्रवशाना सुरक्षितरित्या त्यांच्या स्थळी पोहोचवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com