Maharashtra Floods: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सातारा दौरा रद्द

वातावरण खराब असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द झाला,पुण्यातून आता मुख्यमंत्री पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
CM Uddhav Thackeray cancels Satara visit amid bad weather
CM Uddhav Thackeray cancels Satara visit amid bad weatherDainik Gomantak

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीचा आढावा (Review of flood situation in Maharashtra) घेण्यासाठी साताऱ्यामध्ये येणार होते. परंतु कोयनानगर परिसरातील खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा (Satara) दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.

कोयनानगरच्या परिसरात ढगाळ वातावरण असल्याने मुख्यमंत्री परत पुण्याला माघारी परतले. दुर्घटना ग्रस्त भागाची पहाणी करुन, मुख्यमंत्री 11.30 पर्यंत साताऱ्यात पोहोचणे अपेक्षित होते. त्यानंतर 11.40 वाजता ते कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देऊन ते पूरग्रस्तांची विचारपूस करणार होते. दुपारी 12.15 वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनासोबत मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक देखील होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही आयोजित करण्यात होती. त्यानंतर दुपारी 1.25 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुणे विमानतळावरुन मुंबईच्या दिशेने जाणार होते. परंतु त्यांचे हेलिकॉप्टर साताऱ्यात लँड न होऊ शकल्याने हा दौरा रद्द झाला आहे. पुण्यातून आता मुख्यमंत्री पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

CM Uddhav Thackeray cancels Satara visit amid bad weather
Maharashtra: उद्यापासून निर्बंध शिथिल होण्याची शक्यता

सातारा सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पाटण तालुक्यात भूस्खलन झाले आहे. मौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. तेथे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देणार होते. त्याबरोबरच ते साताऱ्यातील पूर ग्रस्तांच्या निवारा छावणीला देखील मुख्यमंत्री भेट देणार होते.

दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणचा तर 24 जुलैला रायगड जिल्ह्यातील तळीये दरडग्रस्त भागाचा दौरा केला. तेथेल नुकसान ग्रस्त भागाची पहाणी केली. परिस्थितीचा आढावा घेतला असून, आता मुख्यमंत्री नुकसान ग्रस्तांना कधी दिलासा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com