क्रांतीगाथा भवन अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

क्रांतीगाथा भवन येथे विद्यार्थ्यांनी भेट द्यायला हवी; शिक्षकांना केले आवाहन
PM MOdi
PM MOdi Dainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मंबई येथील राजभवनात असणाऱ्या क्रांतीगाथा भवनचे उद्घाटन केले. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक क्रांतीकारक आणि समाज सेवक यांचा ही उल्लेख केला. (Krantigatha Bhavan will inspire many generations - Prime Minister Narendra Modi )

PM MOdi
'भारत' जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक: पंतप्रधान नरेंद्र मोदी

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.तसेच मोदींच्या भाषणात संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा ही समावेश होता. यावेळी वट पौर्णिमेच्या मंगल प्रसंगी आपण आज एकत्र आल्याचं ते म्हणाले. तसेच राजभवनातील क्रांतीगाथा भवनाचे उद्धाटन करताना ही इमारत पुढील अनेक पीढ्यांना प्रेरणा देत राहील. असे ही ते यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भारत छोडो आंदोलनाचा उल्लेख केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, संत तुकाराम महाराज, राज्यातील अनेक समाज सुधारक संत नामदेव महाराज, संत रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, शामजी कृष्ण वर्मा यांचे कार्य व भारताची स्वातंत्र्यासाठीची क्रांती ही तील अनेक राष्ट्रांना प्रेरणादायी आहे. त्यांचे हे कार्य आपल्याला विसरता येणार नाही असे ते म्हणाले.

तसेच देषाच्या विकासात महाराष्ट्राचे स्थान महत्त्वाचे आहे. असे ही ते यावेळी म्हणाले. तसेच ज्या वास्तुचे आज उद्धाटन झाले. ती राजभवनातील क्रांतीगाथा भवन इमारत सर्वांना प्रेरणा देत राहील. देशातील विद्यार्थ्यांनी अशा ठीकाणी भेट द्यायला हवी तसेच शिक्षकांनी त्यांना इकडे घेऊन जायला हवं असे ही ते यावेळी म्हणाले.

PM MOdi
भाजप-काँग्रेसला क्रॉस व्होटिंगची भीती, या जागांवर बिघडली समीकरणे

संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदी आज देहूनगरी

संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूनगरीत होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी देहूत जय्यत तयारी करण्यात आली होती. आज दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देहूनगरीत आगमन झालं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहूमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं.

पंतप्रधान मोदींनी यावेळी विठ्ठलभक्तांना संबोधित केलं. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपचे बडे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मुंबईतील कार्यक्रमांसाठी रवाना झाले. यावेळी पंतप्रधानांनी मुंबईत बोलताना मराठीतून सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com