संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूनगरीत दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी देहूत जय्यत तयारी करण्यात आली. आज दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देहूनगरीत आगमन झालं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहूमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. पंतप्रधान मोदींनी यावेळी विठ्ठलभक्तांना संबोधित केलं. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपचे बडे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मुंबईतील कार्यक्रमांसाठी रवाना झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले, 'मस्तक आहे, पायावरी या संताचीया'' भगवान विठ्ठलाला आज मी प्रणाम करतो. संताच्या अनुभुतीमधूनच भगवतांच्या अनुभुतीची आपल्याला प्रचिती मिळते. संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. राष्ट्रीय पालखी मार्गाचं काम लवकरच पूर्ण केलं जाईल. संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग पाच लेनमध्ये तर संत तुकाराम पालखी मार्ग तीन लेनमध्ये तयार करण्यात येणार आहे. देहूतील शीळा मंदिरांचं पुननिर्माण करणं हे भाग्याचचं आहे. संत तुकारामांनी आपली संपूर्ण संपत्ती जनांसाठी वापरली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला तर कळस संत तुकाराम महाराज झाले.''
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ''संत तुकारामांनी समाजाला अंधश्रध्देपासून दूर ठेवण्यासाठी कार्य केलं. त्यांच्या शब्दांमध्ये एवढी मोठी ताकद होती की, ती कोणीही मिटवू शकलं नाही. तुकारामांच्या शब्दांनी संपूर्ण जनाला व्यापून घेतलं आहे. देहू नगरीत भगवान विठ्ठल सापडतो. येथील प्रत्येक वारकरी संत तुकारामांच्या भक्तीमध्ये लीन झाला आहे. याच कारणामुळे देहूच्या सर्व नागरिकांना मी पुन्हा एकदा नमन करतो. मी ही शीळा म्हणजे ज्ञान आणि भक्तीचा आधार असल्याचं मानतो. दुसरीकडे आज स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षात प्रत्येक नागरिकांना मजबूत करण्यासाठी सरकार काम करत आहे. त्याचबरोबर देशाच्या विकासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. सरकार नव-नव्या योजना तयार करत आहे. यामध्ये प्रत्येकांचा सहभाग असणं आवश्यक आहे.''
फडणवीस म्हणाले, ''आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहीले त्यांचे मी स्वागत करतो. मी स्वता: ला अतिशय भाग्यशाली समजतो, जे की मी मागील जन्मात पुण्य केले असेल त्यामुळे आज मला पंतप्रधानांसोबत या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं. महाराष्ट्र धर्माला जना-जनापर्यंत पोहोचवण्यासाठी संत तुकारामांनी कार्य केलं. तुकाराम महाराजांनी खऱ्या अर्थाने अधंश्रध्देत अडकलेल्या जनांना बाहेर काढण्यासाठी काम केलं. संत तुकारांमांच्या पावलांवर पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जनांसाठी काम करत आहेत. कोरोना काळात प्रत्येक जनांपर्यंत कोरोना (Corona) लस पोहोचवण्यासाठी त्यांनी काम केलं.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.