Konkan Railway: गणपतीला कोकणात जायचंय, तिकीट नाही मिळालं? काळजी नको, आणखी एक विशेष ट्रेन धावणार, जाणून घ्या वेळापत्रक

Konkan Railway Ganpati Special Train: कोकणात गणपतीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने कोकण रेल्वेच्या वतीने आणखी एक ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Konkan Railway: गणपतीला कोकणात जायचंय, तिकीट नाही मिळालं? काळजी नको, आणखी एक विशेष ट्रेन धावणार, जाणून घ्या वेळापत्रक
Western RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

Konkan Railway Unreserved Ganpati Special Train

मुंबई: सर्वत्र लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. बस, ट्रेन, खासगी ट्रॅव्हलस ते अगदी विमानाने कोकणात जाण्यासाठी चाकरमानी लगबग करत आहेत.

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने सर्व ट्रेन फुल्ल झाल्यात त्यामुळे तिकीट न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झालाय. पण, आता काळजी नको कोकण रेल्वेने कोकणात जाण्यासाठी आणखी एक अनारक्षित गणपती विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई सीएसएमटी ते कुडाळ (अनारक्षित) (Mumbai CSMT To Kudal Train)

ट्रेन क्रमांक - ०११०३

बुधवार आणि शुक्रवार (०४ आणि ०६ सप्टेंबर)

मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन दुपारी साडे तीन वाजता सुटेल आणि आणि कुडाळमध्ये पहाटे साडे तीन वाजता कुडाळमध्ये पोहोचेल.

परतीचा प्रवास

कुडाळ ते मुंबई सीएसएमटी (अनारक्षित) (Kudal to Mumbai CSMT)

ट्रेन क्रमांक - ०११०४

गुरुवार आणि शनिवार (०५ आणि ०७ सप्टेंबर)

पहाटे साडे चार वाजता कुडाळ येथून सुटेल आणि सायंकाळी ४.४० मिनिटांनी मुंबई येथे पोहोचेल.

Konkan Railway: गणपतीला कोकणात जायचंय, तिकीट नाही मिळालं? काळजी नको, आणखी एक विशेष ट्रेन धावणार, जाणून घ्या वेळापत्रक
Ganpati Special Trains 2024: गणेशोत्सवानिमित्त Konkan Railway सोडणार विशेष ट्रेन; वेळापत्रक काय, Ticket Booking कधीपासून?

Konkan Railway Ganpati Special Train

थांबा: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामाठे, सावर्डे, आरवली रोड. संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानक.

डब्बे: ट्रेनला एकूण २० डब्बे असतील त्यापैकी १४ सामान्य आणि चार स्लिपर, आणि ०२ एसएलआर कोच असलील. (सर्व अनारक्षित)

ट्रेनबाबत संपूर्ण माहितीसाठी प्रवाशांना enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर अथवा NTES या Mobile App वरुन संपर्क साधता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com