Konkan Breaking: पणदेरी धरणाला मोठी गळती, नागरिकांच्या स्थलांतरणाचे काम सुरू

Konkan Breaking: रत्नागीरी जिल्ह्यातील (Ratnagiri District) मंडणगड तालुक्यातील (Mandangad) पणदेरी धरणाला (Panderi Dam) मोठी गळती लागली आहे.
Konkan Breaking: Panderi dam has started leaking
Konkan Breaking: Panderi dam has started leakingDainik Gomantak
Published on
Updated on

मंडणगड : मंडणगड : रत्नागीरी जिल्ह्यातील (ratnagiri district) मंडणगड तालुक्यातील (mandangad) पणदेरी धरणाला (panderi dam) मोठी गळती लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. धरणातून निघालेल्या कालव्याच्या भिंतीजवळ गळती लागली आहे. तेथून मोठ्या प्रमाणात मुख्य भिंतीतून पाणी झिरपत आहे. त्याचवेळी त्वरीत खबरदारी म्हणून या गावातील नागरिकांना स्थलांतरित (Migrate) करणे सुरू झाले आहे. नागरिकांचे स्थलांतरण करण्यासाठी धरण परिसरात मंडणगड तहसीलदार आणि पोलिस हजर झाले आहेत. (Konkan Breaking: The Panderi dam has started leaking)

या परिसरात त्वरीत नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. त्याचवेळी गळती ठिकाणी पिचिंग करण्याचे काम सुरू असून पाणी गळती होणाऱ्या ठिकाणी पोत्यातून माती भरून भराव घातला जात आहे. तसेच धरण पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा दाब कमी करण्यासाठी सांडव्याची उंची तोडून कमी करण्याचे काम सुरू आहे. या घटनेदरम्यान नागरिक स्थलांतरास किती प्रतिसाद देतात याचा अंदाज सध्या प्रशासनाकडून घेणे चालू आहे. या धरणाशेजारी कमीत कमी पंधरा गावे असून धरणाच्या पायथ्याशी जवळपास सहा वाड्या आहेत.

Konkan Breaking: Panderi dam has started leaking
Special Train: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांची सेंट्रल रेल्वेने केली सोय

स्थानिक प्रशासन गळतीचे प्रमाण पाहून पुढील निर्णय घेईल, मात्र असे असले तरी खबरदारी म्हणून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com