...म्हणून मी 18 दिवस तुरुंगात होतो: देवेंद्र फडणवीस

बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राणा दाम्पत्याचाही उल्लेख केला.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्राचे राजकारण सध्या तापलेले आहे. भाजप नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एका सभेला संबोधित करताना शिवसेनेवर निशाणा साधला. "तुम्ही महाराष्ट्राचे नाही, तुम्ही हिंदुत्ववादी नाही. तुमच्या लोकांच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे," असे फडणवीस म्हणाले. (I was in jail for 18 days says Devendra Fadnavis)

Devendra Fadnavis
औरंगजेबाला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी कळाले; राज ठाकरे

फडणवीस म्हणाले, "बाबरी मशीद पाडली तेव्हा तुम्ही कुठे होता, असा प्रश्न विचारला जात आहे. मी याचे उत्तर देतो. बाबरी मशीद पाडली तेव्हा मी अयोध्येत होतो. मी तिथे 18 दिवस तुरुंगात होतो. पण अयोध्येत शिवसेनेचा एकही नेता नव्हता."

बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राणा दाम्पत्याचाही उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले, "राणा दाम्पत्याला हनुमान चालिसाचे पठण करायचे होते. ते तुरुंगात (Jail) का आहेत? हनुमान चालिसाचे पठण करणे देशद्रोह असू शकतो का?"

Devendra Fadnavis
राज ठाकरेंच्या सभेत गडबड, ठाकरी शैलीत दिला इशारा

यादरम्यान माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आम्ही मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत सरकार स्थापन केले. मात्र, वेळ आल्यावर आम्ही सरकार सोडले. आम्ही कलम 370 रद्द केले." यासोबतच ते म्हणाले, "14 मे नंतर मी मोठा भ्रष्टाचार उघड करणार आहे." ते पुढे म्हणाले की, "आम्हाला सांगण्यात येत आहे की आम्ही चीनच्या (China) विरोधात बोलत नाही, पण तुम्ही त्या लोकांसोबत सरकारमध्ये आहात ज्यांनी चीनला जमीन दिली, आमचे सैनिक गलवान खोऱ्यात लढले, तुम्ही त्यांचा अपमान करत आहात."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com