अनिल देशमुखांविरोधात कुठलाच पुरावा नाही,परमबीर सिंग यांचं प्रतिज्ञापत्र

परमबीर सिंग यांनी या वर्षी मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप केले होते.
I have no evidence against Anil Deshmukh Says Parambir Singh
I have no evidence against Anil Deshmukh Says Parambir Singh Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता.आणि यामुळे राज्यात एकच गोंधळ उडाला होता. या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. या प्रकरणी परवाच अनिल देशमुख यांना ED ने अटक केली आहे. आणि आता परमबीर सिंग यांनी त्यांच्या आरोपांची चौकशी करणारे प्रतिज्ञापत्र आयोगाकडे पाठवले आहे. या शपथपत्रात त्यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले आहे. परमबीर सिंग यांच्या वकिलाने याला दुजोरा दिला आहे की, परमबीर सिंग यांनी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.(I have no evidence against Anil Deshmukh Says Parambir Singh)

मार्च महिन्यात, महाराष्ट्र सरकारने अनिल देशमुख यांच्यावरील परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. चांदिवाल आयोगाने परमबीर सिंग यांना चौकशी आणि चौकशीसाठी अनेक समन्स पाठवले मात्र परमबीर सिंग हजर झाले नाहीत. त्यानंतर आयोगाने त्याच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंटही जारी केले. हजर न राहिल्याने आयोगाने परमबीर सिंग यांना तीनदा दंड ठोठावला. मात्र परमबीर सिंग आले नाहीत.

या प्रकरणी सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परमबीर सिंह यांनी हे पत्र सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. त्याशिवाय त्यांच्याकडे अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही. परमबीर सिंह यांनीही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, ते या प्रकरणी वादविवाद करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रश्नास उत्तर देण्यासही तयार नाहीत.दरम्यान, परमबीर सिंग यांच्याविरुद्ध देखील मुंबई आणि ठाण्यातील पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या वसुलीच्या स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये दोन अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. हे अटक वॉरंट गेल्या आठवड्यात जारी करण्यात आले असून परमबीर सिंग अद्याप बेपत्ताच आहेत . काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अलीकडेच त्यांच्याबद्दल दावा केला होता की ते बेल्जियमला ​​पळून गेले आहेत.

I have no evidence against Anil Deshmukh Says Parambir Singh
अनिल देशमुखांची दिवाळी ED कोठडीत,माजी गृहमंत्र्यांना कोठडीत असतील या मुभा

परमबीर सिंग यांनी या वर्षी मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप केले होते. या पत्रात त्यांनी देशमुख पोलिस अधिकाऱ्यांचा वापर करून मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून 100 कोटींची वसुली करत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता . परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांची सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com